Dhule News: काकाने त्याच्या घरी नेलं, आतून कडी लावली अन्... चिमुरडीने आईला सांगितला धक्कादायक प्रकार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
रात्री झोपण्याची तयारी करताना लहान मुलगी रडू लागली होती. तेव्हा काय झालं? असं विचारलं, तेव्हा तिचं गुप्तांग दुखतय असं सांगितले. त्या वेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. काकाने आपल्याच तीन वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनं सोनगीर गाव हादरून गेलं आहे. नराधम काकाला पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नराधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे. आरोपी काकाचं नाव मयूर बापू माळी असे आहे.
नवरात्रीत स्त्री शक्तीचा जागर करत कन्या पुजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झाला. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी काल सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मयुर माळीवर फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता. सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयुर माळीला अटक केली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळच्या सुमारास दुधवाल्याकडे दूध आणण्यासाठी आजीसोबत माझी तीन वर्षांची मुलगी देखील गेली होती. थोड्यावेळानंतर सासुबाई घरात आल्या तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ती चुलत काका मयूर माळी आला तो तिला खेळण्यासाठी घरी घेऊन गेला होता. थोड्यावेळानंतर ती घरी आली, रात्री झोपण्याची तयारी करताना लहानमुलगी रडू लागली होती. तेव्हा काय झालं? असं विचारलं. तेव्हा तिचं गुप्तांग दुखतय असं सांगितले. लहान मुलीने रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
advertisement
काकाने आतून कडी लावली अन्...
काकाने त्याच्या घरी नेलं आणि आतून कडी लावली. बाहेर एक बाबा आला आहे असं त्यानं तिला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीनं घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. हे संपूर्ण प्रकरण ऐकून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडितेची आई पोलिस ठाण्यात गेली आणि तिथे तक्रार नोंदवली.
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
October 02, 2025 8:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule News: काकाने त्याच्या घरी नेलं, आतून कडी लावली अन्... चिमुरडीने आईला सांगितला धक्कादायक प्रकार