झोपेच्या गोळ्या, सिक्रेट मीटिंग अन् खतरनाक शेवट, बॉयफ्रेंडसोबत दिसलेल्या पत्नीचा ऑन द स्पॉट मर्डर

Last Updated:

संशय, विश्वासघात आणि त्यातून निर्माण झालेल्या रागाने पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पतीला पत्नी तिच्या प्रियकरासोबत असल्याचं समजताच त्याने रागाच्या भरात पत्नीला संपवून टाकलं आहे.

झोपेच्या गोळ्या, सिक्रेट मीटिंग अन् खतरनाक शेवट, बॉयफ्रेंडसोबत दिसलेल्या पत्नीचा ऑन द स्पॉट मर्डर (AI Image)
झोपेच्या गोळ्या, सिक्रेट मीटिंग अन् खतरनाक शेवट, बॉयफ्रेंडसोबत दिसलेल्या पत्नीचा ऑन द स्पॉट मर्डर (AI Image)
संशय, विश्वासघात आणि त्यातून निर्माण झालेल्या रागाने पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पतीला पत्नी तिच्या प्रियकरासोबत असल्याचं समजताच त्याने रागाच्या भरात पत्नीला संपवून टाकलं आहे. विजयची पत्नी गीताचे दिलीप नावाच्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. विजयने गीताला या नात्याबद्दल वारंवार इशारा दिला होता, तसंच दिलीपसोबतचे संबंध संपवायलाही सांगितलं होतं, पण तरीही गीताने पतीचं ऐकलं नाही. गीता आणि दिलीप एकमेकांना भेटत राहिले, त्यामुळे पती-पत्नीमधला तणाव वाढत गेला.
पत्नी वारंवार प्रियकराला भेटत असल्यामुळे विजय अधिकच निराश आणि अपमानित होत गेला. पत्नी प्रियकराला भेटण्यासाठी आपल्याला झोपेच्या गोळ्या आणि मादक पदार्थ देत असल्याचंही विजयला समजलं, त्यानंतर विजयचा राग आणि संशय आणखीनच बळावला.
झोपेच्या गोळ्या आणि सिक्रेट मीटिंग
घटनेच्या रात्री विजय घराबाहेर होता, तेव्हा दिलीप गीताला भेटण्यासाठी आला होता. पण विजय अचानक घरी परतला, तेव्हा त्याने दोघांना एकत्र बघितलं, यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं आणि याचं रुपांतर हिंसाचारात झालं. वादावादीमध्ये गीताने विजयवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यानंतर झालेल्या हाणामारीमध्ये विजयने तिच्याकडून चाकू हिसकावून घेतला आणि याच चाकूने त्याने गीतावर हल्ला केला, यातच गीताचा तात्काळ मृत्यू झाला.
advertisement
पत्नीच्या प्रियकरावरही हल्ला
पत्नी गीतावर हल्ला करून विजय थांबला नाही, तर त्याने दिलीपवरही काठीने हल्ला केला, ज्यात दिलीपचा पाय फ्रॅक्चर झाला. गंभीर जखमी झालेल्या दिलीपला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विजयच्या हल्ल्यात दिलीपला बऱ्याच जखमा झाल्या असल्या तरी तो धोक्यापासून बाहेर आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक पथकांनी गुन्हा घडला त्या ठिकाणी म्हणजेच कर्नाटकच्या मैसूरमधल्या मुक्कानहल्ली गावात तपासणी केली असून पुरावे गोळा केले आहेत. याप्रकरणी विजयला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
मराठी बातम्या/देश/
झोपेच्या गोळ्या, सिक्रेट मीटिंग अन् खतरनाक शेवट, बॉयफ्रेंडसोबत दिसलेल्या पत्नीचा ऑन द स्पॉट मर्डर
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement