इथे घटस्फोटाच्या चर्चा, तिथे कोर्टात पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक! गुगलवरच खटला ठोकला, काय आहे प्रकरण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूडचे पॉवर कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी गुगलविरोधात खटला दाखल केला असून ४ कोटींची मागणी केली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे पॉवर कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या युट्यूब चॅनेलमुळे प्रचंड संतापले आहेत. आपल्या वैयक्तिक अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी बच्चन दांपत्याने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून, संबंधित युट्यूब चॅनेल आणि त्याची पालक कंपनी असलेल्या गुगलवर स्वतंत्र खटला दाखल केला आहे!
४ कोटींची नुकसानभरपाई मागितली
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने रिव्ह्यू केलेल्या कायदेशीर कागदपत्रांनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकने हा खटला दाखल करताना ४ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून मागितली आहे. ६ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या याचिकेत या सेलिब्रिटी कपलने युट्यूबवरून त्यांचे व्हिडिओ तत्काळ हटवण्याची आणि बॅन करण्याची मागणी केली आहे.
हा खटला दाखल करण्याचं मुख्य कारण म्हणजे, युट्यूबवर AI च्या मदतीने तयार केलेले भयंकर आणि अश्लील डीपफेक व्हिडिओज आहेत. या व्हिडिओजमुळे त्यांची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
AI मॉडेलला प्रशिक्षण देण्यावरही बंदीची मागणी
बच्चन दांपत्याने न्यायालयाला अशीही विनंती केली आहे की, युट्यूब चॅनेलला एक असा आदेश दिला जावा, ज्यामुळे त्यांचे व्हिडिओ प्रतिस्पर्धी AI मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाणार नाहीत.
त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केलं आहे की, आजकाल प्लॅटफॉर्म्स AI च्या वापराला परवानगी देत असल्यामुळे याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या चॅनेलवर बच्चन दांपत्याची नकारात्मक प्रतिमा दाखवणारे २५९ हून अधिक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत, ज्यांना १६.५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. यातील एका व्हिडिओत सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा पूलमध्ये असलेला डीपफेक व्हिडिओ सर्वात जास्त व्हायरल झाला होता.
advertisement
गुगल आणि युट्यूबमध्ये असे सेफगार्ड्स असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही कंटेंटमध्ये त्यांची प्रतिमा किंवा आवाजाचा गैरवापर होणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
इथे घटस्फोटाच्या चर्चा, तिथे कोर्टात पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक! गुगलवरच खटला ठोकला, काय आहे प्रकरण?