रामायण हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तर भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. यामधील पात्रं, घटना आणि संदेश पिढ्यानुपिढ्या लोकांना प्रेरणा देत आले आहेत. रामायणावर अनेक टीव्ही शोज आणि चित्रपट बनवले गेले आहेत. या रामायणासंबंधित कलाकृती युवा पिढीला आपल्या धार्मिक ग्रंथांशी जोडून ठेवतात. अभिमाभ बच्चन यांच्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातही अनेकदा रामायणासंबंधित प्रश्न विचारले जातात.
advertisement
सोनाक्षी सिन्हाला विचारलेला 'हा' प्रश्न
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हाची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला केबीसीच्या मंचावर 'रामायण' संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र तिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर देता आलं नाही. त्यामुळे अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं आणि आजही केलं जातं. सोनाक्षीला विचारण्यात आलेला प्रश्न असा होता की,"रामायणानुसार, हनुमान संजीवनी बुटी कोणासाठी घेऊन आले होते?"
ऑप्शन होते:
A. सुग्रीव
B. लक्ष्मण
C. सीता
D. राम
सोनाक्षी सिन्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देता आलं नाही. तिने आधी 'सीता' आणि नंतर 'राम' असं उत्तर देण्याचा विचार केला. नंतर तिने 'Ask The Expert' ही लाईफलाइन वापरली आणि बरोबर उत्तर ‘लक्ष्मण’ निवडलं. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. ज्यांच्या घराचं नाव ‘रामायण’ आहे, वडिलांचं नाव शत्रुघ्न आहे, भावांची नावं लव आणि कुश आहेत, तरीही तिला रामायणाबाबतीत इतकी मूलभूत माहिती नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी सोनाक्षीला चांगलच ट्रोल केलं.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग
ट्विटरवर #YoSonakshiSoDumb सारखे ट्रेंड सुरू झाले आणि मीम्सचा पाऊस पडला. नंतर सोनाक्षीने हे सगळं हसून घेतलं आणि ट्रोलर्सना उत्तरही दिलं. पण या घटनेमुळे हेही स्पष्ट झालं की आजची पिढी धार्मिक आणि सांस्कृतिक ज्ञानापासून कशी दूर जात आहे. रामायणसारखे ग्रंथ हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर नैतिक शिक्षणाचाही एक स्रोत आहेत. विजयादशमीसारखे सण आपल्याला याची आठवण करून देतात की या कथा फक्त मंचावर सादर करण्यापुरत्या नसाव्यात, तर जीवनातही उतरवायला हव्यात.