पुण्यात श्री महालक्ष्मीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी, दसऱ्याला पाहा देवीचं आकर्षक रूप, Video

Last Updated:

Vijayadashami Dasara 2025: पुण्यातील सारसबाग श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला दसऱ्याच्या दिवशी नेसवली जाणारी सोन्याची साडी ही केवळ संपत्तीचे प्रतीक नसून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे मूर्त रूप आहे.

+
पुण्यात

पुण्यात श्री महालक्ष्मीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी, दसऱ्याला पाहा देवीचं आकर्षक रूप, Video

पुणे : हिंदू धर्मात विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सोन्याला महत्त्व आहे. पुण्यातील सारसबागच्या श्री महालक्ष्मी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी देवीला सुवर्णसाडी परिधान करण्यात आली. विशेष म्हणजे ही साडी 16 किलो सोन्याची असून तिच्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आलंय. सुवर्णसाडीतील देवीचं रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. लोकल18 च्या माध्यमातून याबाबतच जाणून घेऊ.
श्री महालक्ष्मीला नेसवलेली ही सुवर्णसाडी दक्षिण भारतातील कुशल कारागिरांनी साकारली असून तिच्या निर्मितीस तब्बल सहा महिने लागले. सोन्याच्या धाग्यांमध्ये केलेले बारकाईचे नक्षीकाम, कलात्मक डिझाईन्स आणि देखणेपणामुळे ही साडी अत्यंत उठावदार दिसते. विशेष म्हणजे, एका भक्ताने ही साडी देवीला अर्पण केली असून ती आता मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून परंपरेनुसार वर्षातून दोनदा देवीला नेसवली जाते.
advertisement
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. या परंपरेनुसार दसरा आणि लक्ष्मीपूजन या दोन प्रमुख सणांमध्ये देवीला सोन्याची साडी नेसवली जाते. विशेष म्हणजे, दसऱ्याच्या दिवशी पुरातन काळापासून सोने लुटण्याची प्रथा प्रचलित आहे. या परंपरेचा सन्मान राखतच देवीला सुवर्णवस्त्र परिधान करण्याचा विधी केला जातो.
advertisement
देवीला परिधान करण्यात आलेल्या या साडीचे वजन तब्बल 16 किलो आहे. इतक्या सोन्याची साडी तयार करण्यासाठी कारागिरांनी बारकाईने केलेले नक्षीकाम भाविकांच्या आकर्षणाचा विषय ठरले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनेकांनी सुवर्णवस्त्रातील देवीचे दर्शन घेतले आणि या सौंदर्याचा अनुभव घेतला.
सुवर्णसाडीतील देवीचे दर्शन घेण्यासाठी पुणे शहरासह विविध भागांतून भाविकांनी मंदिरात हजेरी लावली. दिवसभर देवीच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला. मंदिर प्रशासनाने या निमित्ताने विशेष सजावट केली होती. देवीच्या गाभाऱ्यात सुवासिक फुलांची आरास, आकर्षक विद्युत रोषणाई आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झालेल्या आरत्या यामुळे उत्सवाचा उत्साह होता.
advertisement
यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी म्हणाले की, ही परंपरा फक्त धार्मिक श्रद्धेची नसून सांस्कृतिक वारसा जपणारी आहे. सोन्याची साडी म्हणजे केवळ वैभव नव्हे तर देवीवरील भक्तांचा असीम विश्वास आणि भक्तीचे प्रतीक आहे. दरवर्षी याच दिवशी हजारो भाविक या सुवर्णदर्शनासाठी सारसबागेत येतात.
पुण्यातील सारसबाग श्री महालक्ष्मी मंदिरात दसऱ्याच्या दिवशी नेसवली जाणारी सोन्याची साडी ही केवळ संपत्तीचे प्रतीक नसून भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे मूर्त रूप आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी याच क्षणाची प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांसाठी देवीचे सुवर्णदर्शन ही अनमोल आध्यात्मिक अनुभूती ठरते.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात श्री महालक्ष्मीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी, दसऱ्याला पाहा देवीचं आकर्षक रूप, Video
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement