प्रत्यक्षदर्शींच्या मते, संगीत कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच गर्दीचा संयम सुटू लागला होता. प्रेक्षकांमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी सुरू झाली. या गोंधळात काही प्रेक्षक बेशुद्धही पडले. यानंतर त्यांना ताबडतोब प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले आणि नंतर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
परिस्थितीबाबत, पोलीस आणि आयोजकांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचले, असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
advertisement
वृत्तानुसार, बेधुंद जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अनेक लोक घटनास्थळीच बेशुद्ध पडले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अद्याप कोणत्याही गंभीर दुखापतीची पुष्टी झालेली नाही.
5 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या आणि 13 नोव्हेंबर रोजी संपणाऱ्या बाली यात्रेदरम्यान गायिका श्रेया घोषालचा संगीत कार्यक्रम नियोजित होता. शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीचे नियोजन होते. हा ऐतिहासिक मेळा बोईता बंदना विधीच्या माध्यमातून राज्याच्या सागरी भूतकाळाचे स्मरण करतो. लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.
