TRENDING:

'साराभाई' कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपला! लाडक्या डॅडच्या आठवणीत सुमीत राघवर ढसाढसा रडला, डोळे पाणावणारा VIDEO VIRAL

Last Updated:

Satish Shah Death : आपल्या मिश्किल अभिनयाने घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे किडनीच्या आजाराने उपचार सुरू असताना वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या मिश्किल अभिनयाने घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे किडनीच्या आजाराने उपचार सुरू असताना वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. विशेषतः 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेतील 'इंद्रवदन साराभाई' या भूमिकेमुळे ते संपूर्ण देशाचे लाडके बनले होते. त्यांच्या निधनाने चाहत्यांनी साराभाई कुटुंबाचा 'कर्ता पुरुष' हरपल्याची भावना व्यक्त केली.
News18
News18
advertisement

या दु:खद प्रसंगी, मालिकेत त्यांच्या मोठ्या मुलाची, म्हणजेच 'साहिल'ची भूमिका साकारणारे अभिनेते सुमित राघवन यांनी एक अत्यंत भावूक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या लाडक्या 'डॅड'ला निरोप दिला आहे.

"इंद्रवदनची जागा कोणीच घेऊ शकत नाही!"

सुमित राघवनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सतीश शाह यांच्या आठवणींना उजाळा देताना त्याला अश्रू अनावर झाले. तो म्हणाला, "२००४ मध्ये आम्ही एक मालिका सुरू केली, जी १७ भागांनंतर बंद झाली. पण आज लोकांना हा कार्यक्रम आपलासा वाटतो. अनेकजण आम्हाला आमच्या भूमिकांच्या नावाने ओळखतात. लोक सांगतात की, मी आमच्या घरातला 'साहिल' आहे, किंवा तो 'रोशेष' आहे. मात्र, कोणीही कधी 'हा आमच्या घरातला इंद्रवदन आहे' असं म्हटलं नाही. कारण इंद्रवदन एकच होता! तो म्हणजे आमचे सतीश काका."

advertisement

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर बंद, CBI च्या क्लोजर रिपोर्टमधून नेमकं काय समोर आलं?

सुमित राघवनने सांगितले की, 'साराभाई' मालिकेमुळे केवळ चाहता वर्गच तयार झाला नाही, तर कलाकारांचे बॉण्डिंग खूप घट्ट झाले. "आम्ही जेव्हा भेटायचो, तेव्हा सतीश, सुमित म्हणून नाही, तर साहिल, डॅड, मॉम याच नात्याने भेटायचो," अशी आठवण त्याने सांगितली. सुमित म्हणाला की, आज साराभाई कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य आणि कर्ता पुरुष आम्हाला सोडून गेला आहे.

advertisement

तो पुढे म्हणाला, "अनेक दिवसांपासून ते संघर्ष करत होते. जेवढे साराभाईचे चाहते आहेत, त्यांच्या आदरांजली मी स्वीकारतो. मी कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून तुमच्या भावनांचा स्वीकार करतो."

पाणावलेल्या डोळ्यांनी दिला निरोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

व्हिडिओच्या शेवटी सुमित राघवनचे डोळे पाणावले. त्याने जड अंतःकरणाने आपल्या ऑन-स्क्रीन वडिलांना निरोप दिला. सुमित म्हणाला, "मी डॅडला एवढंच सांगेन की, तुमचा प्रवास सुरक्षित असो. दुसऱ्या बाजूला आपण लवकरच भेटू... खूप सारं प्रेम." सुमितने या व्हिडिओला, "सतीश काका, आम्हाला तुमची फार आठवण येईल. डॅड, लव्ह यू, वी ऑल लव्ह यू इंदू, नारदमुनी..." असे कॅप्शन दिले आहे. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'साराभाई' कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपला! लाडक्या डॅडच्या आठवणीत सुमीत राघवर ढसाढसा रडला, डोळे पाणावणारा VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल