सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर बंद, CBI च्या क्लोजर रिपोर्टमधून नेमकं काय समोर आलं?

Last Updated:

Sushant Singh Rajput death case : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या २०२० मधील वादग्रस्त मृत्यू प्रकरणाला आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) क्लोजर रिपोर्ट दिला आहे.

News18
News18
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या २०२० मधील वादग्रस्त मृत्यू प्रकरणाला आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) क्लोजर रिपोर्ट दिला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या अहवालात सीबीआयने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि इतर सर्व आरोपींना क्लीन चिट दिली आहे. सीबीआयच्या या निष्कर्षांमुळे सुशांतच्या कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी आता वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत वांद्रे येथील आपल्या घरी मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या सहकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

आरोप सिद्ध होण्यासारखे पुरावे सापडले नाहीत

रियाने सुशांतला बेकायदेशीर कोठडीत ठेवले, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आणि त्याच्या मालमत्तेची चोरी केली, असे आरोप कुटुंबियांनी लावले होते. सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे आणि नंतर बिहार पोलिसांकडे असलेला हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
advertisement
सीबीआयने आपल्या अंतिम अहवालात स्पष्ट केले आहे की, तपासामध्ये रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्धच्या 'बेकायदेशीर कोठडी', 'आत्महत्येस प्रवृत्त करणे' किंवा 'चोरी' या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. रिया आणि तिच्या सहकाऱ्यांवर दोष सिद्ध होईल, असे ठोस निष्कर्ष सीबीआयला काढता आले नाहीत.
advertisement

कुटुंबियांचा संताप आणि पुढचे पाऊल

सीबीआयने हा अहवाल सादर करताच, सुशांतच्या कुटुंबियांनी त्वरित यावर नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतला न्याय मिळाला नसल्याची त्यांची भावना आहे. या अहवालावर समाधान न झाल्याने, सुशांतचे कुटुंब आता या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाला इतकी वर्ष उलटूनही, अजूनही या मृत्यूचे गूढ पूर्णपणे उलगडले नसल्याची भावना सुशांतचे चाहते आणि कुटुंबिय व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर बंद, CBI च्या क्लोजर रिपोर्टमधून नेमकं काय समोर आलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement