Satara Doctor: 4 मुद्दे अन् 2 पुरावे, महिला डॉक्टरवर खासदारांचा दबाव का होता? दानवेंकडून सगळी कुंडली बाहेर

Last Updated:

सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने जीवन संपवल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

News18
News18
सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टरने लिहिलेलं एक पत्र समोर आलं आहे. ज्यात त्यांनी खासदाराचा दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. हे पत्र समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचाच महिला डॉक्टरवर राजकीय दबाव होता, असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दानवे यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी दाखवावे, असं थेट आव्हान निंबाळकर यांनी दिलं आहे. शिवाय महिला डॉक्टरच्या मृत्यूला राजकीय रंग देऊ नये, असं म्हटलं. यानंतर अंबादास दानवे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाशी त्यांचा कसा संबंध आहे, हेही पुराव्यासह दाखवलं आहे. शिवाय या प्रकरणात डीवायएसपी राहुल धस आणि पीआय अनिल महाडिक यांचा काय संबंध आहे? हे तपास अधिकाऱ्यांनी सांगावं, अन्यथा मला हेही उघड करावं लागेल, असं थेट चॅलेंज दानवे यांनी दिलं.
advertisement

अंबादास दानवे ट्विटमध्ये नक्की काय म्हणाले?

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील, ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. 'तो मी नव्हेच' म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पाहा....
1. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला, असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक २१ ते ३१ यावर हे स्पष्ट नमूद केले आहे.
advertisement
2. याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी 'आपण बीडचे असल्याने आरोपीला 'फिट' देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे' असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे.
3. दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे.
advertisement
4. महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे!
advertisement
आता एवढं दिल्यावर तापास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पीआय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल. बाकी हे महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आहेच, हे नवीन राहिलेले नाही. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहेच.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Doctor: 4 मुद्दे अन् 2 पुरावे, महिला डॉक्टरवर खासदारांचा दबाव का होता? दानवेंकडून सगळी कुंडली बाहेर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement