Satish Shah Death: 'त्याला तिच्यासाठी जगायचं होतं...', मित्राच्या निधनाने सचिन पिळगांवकर हादरले, धक्क्यातून सावरणं कठीण

Last Updated:
Satish Shah Death: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांना मोठा धक्का बसला आहे.
1/8
मुंबई: 'जाने भी दो यारो', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' आणि 'कभी हा कभी ना' अशा अनेक लोकप्रिय चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी ७४ व्या वर्षी निधन झाले.

advertisement
2/8
अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किडनी निकामी झाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांना मोठा धक्का बसला आहे.

3/8
सचिन पिळगांवकर यांनी 'न्यूज१८ शोशा'शी बोलताना सतीश शाह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक किस्सा सांगितला. सचिन आणि सतीश यांची मैत्री १९८७ मध्ये सचिन दिग्दर्शित 'गंमत जंमत' या मराठी चित्रपटाच्या सेटवर जुळली होती.

4/8
सचिन म्हणाले,
सचिन म्हणाले, "त्या चित्रपटानंतर आम्ही कधी एकत्र काम केले नाही, पण त्या सेटवर आमची अशी गट्टी जमली की ती आयुष्यभर टिकली. सतीश, त्यांची पत्नी मधु, सुप्रिया आणि मी खूप जवळ आलो. महिन्यांतून किमान दोन-तीन वेळा तरी आम्ही भेटायचो. ते आमच्या कुटुंबाचा भाग होते. त्यांच्याशिवाय आम्ही कोणतेही समारंभ साजरे करू शकत नव्हतो."
advertisement
5/8
यावेळी सचिन पिळगांवकर यांनी सतीश शाह यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक हृदय हेलावून टाकणारी गोष्ट सांगितली. सतीश यांची पत्नी मधु यांची तब्येतही बरी नाहीये, त्यांना अल्झायमर आहे.
यावेळी सचिन पिळगांवकर यांनी सतीश शाह यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक हृदय हेलावून टाकणारी गोष्ट सांगितली. सतीश यांची पत्नी मधु यांची तब्येतही बरी नाहीये, त्यांना अल्झायमर आहे.
advertisement
6/8
सचिन म्हणाले,
सचिन म्हणाले, "सतीश आणि मधु नेहमीच खूप आनंदी आणि उत्साही असायचे. या वर्षात सतीश यांनी स्वतःची किडनी ट्रान्सप्लांट करवून घेतली. त्यांना मधुची काळजी घेण्यासाठी जगायचं होतं. डायलिसिसवर असतानाही त्यांना जगायची खूप इच्छा होती."
advertisement
7/8
सतीश शाह यांच्या निधनाची बातमी ऐकून आपण धक्क्यात असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले. ते म्हणाले,
सतीश शाह यांच्या निधनाची बातमी ऐकून आपण धक्क्यात असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले. ते म्हणाले, "सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटायला गेली होती. मी शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने जाऊ शकलो नाही. तेव्हा त्यांनी गाणी लावली आणि सुप्रिया व मधुने डान्सही केला."
advertisement
8/8
सचिन यांनी खुलासा केला,
सचिन यांनी खुलासा केला, "आम्ही दोघे सतत मेसेजवर बोलत होतो. खरं सांगायचं तर, आज दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी मला त्यांचा एक मेसेज आला, याचा अर्थ तेव्हा ते ठीक होते. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीचे नुकसान झालेच, पण ही माझ्यासाठी एक खूप मोठी वैयक्तिक हानी आहे."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement