अभिनेता रजत बेदीने फिल्म जोडी नं.1 चे काही किस्से सांगितले आहेत. अभिनेता म्हणाला कि, गोविंदा सेटवरती 9 तास उशिरा पोहचला,तेव्हा संजय दत्त खुप रागवला होता. गोविंदाला शिव्या घालायला लागला. गोविंदा बॅालिवुड इंडस्ट्रीतील एक स्टार अभिनेता आहे. त्याच्या विनोदाच्या टाईमिंगचा प्रत्येकजण चाहता आहे. गोविंदाच्या शुटींगबद्दलचे काही किस्से बोलले जातात.
गोविंदा जेव्हा जोडी नं.1 फिल्मच्या सेटवर 9 तास उशिरा पोहचला
advertisement
हल्लीच अभिनेता रजत बेदी याने 'द बैड्स ऑफ बॉलीवूड' मधुन पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. त्याने गोविंदा विषयी एक किस्सा सा्ंगितला आहे. रजत बेदी म्हणाला ,"जेव्हा गोविंदा सेटवरती उशिरा आला, तेव्हा संजय दत्त खुप रागवला होता. गोविंदा एक चांगला माणुस आहे, पण त्याच्या सोबत एक वाईट घडले "
पुढे रजत बेदी म्हणाला, "गोविंदाने त्यावेळी इतर जास्त कामे घेतली होती. जोडी नं.1 फिल्म वेळेस, डायरेक्टर डेविड धवन यांना सकाळी 7 वाजता शुटिंग सुरु करायची होती. पण मी आणि संजय दत्त 6 वाजता सेटवरती पोहचायचो . काही वेळ गोविंदाची वाट पाहत राहायचो. तास गेला तरी गोविंदाचा पत्ताच नसायचा.सर्वजण गोविंदाची वाट पाहत राहायचे,म्हणजे शूटींग सुरु करता येईल."
संजय दत्तने गोविंदाला का शिव्या घातल्या
रजत बेदी म्हणाला,"जेव्हा गोविंदा पोहचला नाही ,तेव्हा समजले तो घरीच आहे. त्यानंतर एक माणुस गोविंदाच्या घरी गेला,जेणेकरुन शुटला लवकर सुरु होईल. पण ती व्यक्तीही त्याच्या घराच्या खाली वाट पाहत राहीली. यात 8 तास गेले. यामुळे संजय दत्त नाराज झाला आणि सेट वरती तो गोविंदाला शिव्या घालायला लागला. तेव्हा समजले कि गोविंदा घरी नाहीये. तो हैदराबाद वरुन डायरेक्ट सेट वरती येईल. कोणालाच माहिती नव्हते कि,गोविंदा दुपारी 3 वाजता फ्लाईटने डायरेक्ट सेटवर येणार आहे. त्यावेळी कोणालाच त्याचे काही समजत नव्हते. कारण तो त्यावेळी 4-5 शिफ्ट एकदम करत होता. जेव्हा गोविंदा सेटवरती आला तेव्हा संजय दत्तला त्याचा सीन मिळाला. पाहिल्यावर समजले संजय दत्तला जास्त डायलॅाग आहेत. तेव्हा सीन बदलायला सांगितले. गोविंदाने काही तासातच शुट पुर्ण केले."