प्रकाश कौर यांच्या वाढदिवसानिमित्त सनी देओल आणि बॉबी देओल यांनी इन्स्टाग्रामवर काही खास अनसीन फोटोज् शेअर केले आहेत. सध्या दोन्हीही भावांनी शेअर केलेल्या फोटोंची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत आहे.
3 रुपयांसाठी 24 तास काम करायचा; 'तारक मेहता'चा हा प्रसिद्ध अभिनेता
शेअर केलेल्या पोस्टमध्ये सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो आणि आई प्रकाश कौर दिसत आहे. दोघेही फोटोमध्ये एक आनंदीत होऊन पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये, प्रकाश कौर यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस वेअर केलेला दिसत आहे. तर सनीने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसत आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” सनी देओलच्या पोस्टवर त्याच्या मुलांनीदेखील आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
तर, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलनेही आईबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला. त्यातील पहिल्या फोटोमध्ये बॉबीने त्याच्या आईला मिठी मारल्याचे पाहायला मिळत आहे. तर ,दुसऱ्या फोटोमध्ये बॉबी आणि सनी आपल्या आईसोबत एक सेल्फी घेताना दिसत आहे. वाढदिवसाचे फोटो शेअर करताना बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आई लव्ह यू, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” कॅप्शनमध्ये पुढे हार्ट इमोजीदेखील शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. धर्मेंद्र आणि बॉबीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनीही प्रकाश कौर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्याही इन्स्टाग्राम पोस्ट चाहत्यांमध्ये कमालीच्या चर्चेत आहेत.
धर्मेंद्र यांनी १९५४ साली, पंजाबी रितीरिवाजांनुसार प्रकाश कौर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. असे म्हटले जाते की, त्यांचं अरेंज मॅरेज असून जेव्हा धर्मेंद्र आणि प्रकाश यांचं लग्न झालं तेव्हा प्रकाश फक्त १९ वर्षांच्याच होत्या. लग्नानंतर प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना दोन मुलं आणि दोन मुलींचे पालक झाले. सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता असं त्यांच्या मुलांचे नावं आहेत. प्रकाश यांच्यासोबत लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी घटस्फोट न घेताच दुसरं लग्न केलं. धर्मेंद्र यांनी पहिल्या लग्नाच्या 26 वर्षांनंतर हेमा मालिनींसोबत लग्न केले. धर्मेंद्र यांच्या या कृतीने घरातील सर्वांनाच धक्का बसला होता. धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं तरीही प्रकाश यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट दिला नाही. धर्मेंद्र आणि हेमा यांना ईशा देओल आणि अहाना देओल अशा दोन मुली आहेत.
अॅक्शन, सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेला क्राइम थ्रिलर, ओटीटीवर गाजतोय