लाखोंच्या गर्दीत कोणी ओळखू नये म्हणून सूरज चव्हाणने आपल्या चेहऱ्यावर रूमाल बांधला होता. इतर नागरिकांप्रमाणेच सूरज चव्हाण देखील रांगेत उभा राहून दादांच्या शेवटच्या दर्शनाची वाट पाहत होता. लाखोंच्या गर्दीत सूरजने शेवटपर्यंत वाट पाहिली. गर्दी थोडी कमी झाल्यावर सूरज चव्हाण अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी पुढे गेला.
( अजित दादांसाठी भावुक झाला रितेश देशमुख, Bigg Boss सोडून पोहोचला बारामतीत, पाहा VIDEO )
advertisement
सूरज चव्हाणने दादांची अखेरची भेट घेऊपर्यंत खूप उशिर झाला होता. अजित दादांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे सूरजला दादांचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. अत्यंत जड अंत: करणाने सूरज चव्हाणने दादांच्या जळत्या चितेसमोरच डोकं टेकवलं.
अंत्यसंस्कारानंतर सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना शब्दांत व्यक्त केल्यात. त्याने पोस्टमध्ये लिहिलं, "आई-वडिलांनंतर मी तुमच्यात माझे आई-आप्पा पाहात होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं MISS YOU DADA." सूरजचा व्हिडीओ, त्याचं दादांवरच प्रेम, त्यांना भेटण्यासाठीची तळमळ हे सगळं पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत.
सूरज चव्हाण आणि अजित पवार यांचं अत्यंत भावनिक नातं होतं. अजित दादांना तो देव मानायचा. आई-वडिलांसारख्या मायेच्या नजरेने पाहत होता. दादांनी सूरज चव्हाणला एक नवं आयुष्य उभं करून दिलं. सूरज चव्हाणला बारामतीच्या मोढवे गावात त्याचं हक्काचं घर बांधून दिलं.
सूरज चव्हाण तसंच अभिनेता रितेश देशमुख देखील अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला होता. रितेशनं त्याच्या बिग बॉसच्या शूटींगमधून वेळ काढून अजित दादांना शेवटचा निरोप दिला.
