'तलाश' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा त्याच्या पात्राभोवती फिरते.
काय आहे कथानक?
'तलाश' या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते ती एक प्रसिद्ध अभिनेता अरमान कपूरच्या अपघाताने. भरधाव वेगात असलेली अरमानची गाडी नियंत्रण सुटून थेट समुद्रात कोसळते आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. या केसची चौकशी इन्स्पेक्टर सुरजन सिंह शेखावत करत असतो, ज्याची भूमिका आमिर खानने निभावली आहे. सुरजन सिंह स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक संकटांना तोंड देत असतो. त्याच्या मुलाचा - करणचा मृत्यू झाल्यापासून तो डिप्रेशनमध्ये असतो आणि त्याला नीट झोप लागत नाही. तसेच त्याची पत्नी रोशनीसोबत त्याचे नातेही ताणलेले असते.
advertisement
शाहरुखने KISS केलं, मिठी मारली; मराठमोळ्या अभिनेत्रीला किंग खानने स्टेजवर दिली अशी वागणूक; पाहा VIDEO
'तलाश'चा चक्रावणारा ट्विस्ट
अरमान कपूरच्या मृत्यूच्या केसची चौकशी करताना सुरजनला समजते की, अरमानच्या गाडीतून 20 रुपये गायब होतात. पुढे चौकशीत कळतं की अपघातापूर्वी अरमानने शशी नावाच्या ब्लॅकमेलरला हे पैसे दिले होते. शशि आणि त्याचा साथीदार तैमूर, अरमानच्या मित्राला संजयला ब्लॅकमेल करत असतात. त्यामुळे संजय दोघांची हत्या करवून घेतो. कथा खऱ्या अर्थाने रंगत जाते जेव्हा सुरजनची भेट रोजी नावाच्या मुलीशी होते. रोजी त्याला या केसच्या तपासात मदत करत असते. पण एक मोठा खुलासा क्लायमॅक्समध्ये होतो. रोजीच खऱ्या अर्थाने मिस्ट्री असते आणि ते रहस्य उलगडण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. 'तलाश' हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
तगडी स्टारकास्ट असलेला 'तलाश'
'तलाश'मध्ये आमिर खान, करीना कपूर आणि राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव आणि शीबा चड्ढा सुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. रीमा कागती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली हा चित्रपट तुम्हाला प्रत्येक वळणावर नवा ट्विस्ट देतो आणि तुम्ही एक क्षणही कंटाळत नाही. 'तलाश' ही एक जबरदस्त थ्रिलर आहे, जी मिस्ट्री आणि इमोशन्सचं परफेक्ट मिश्रण आहे. क्लायमॅक्स तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे.