तेजश्रीने ‘लिव्ह इन’च्या वाढत्या ट्रेंडवर टीका केली आणि लग्नाचं महत्त्व सांगितलं. ती म्हणाली, "लग्न ही आयुष्यातली सर्वात गोड गोष्ट आहे."
"यात फक्त दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबं एकत्र येतात. तुम्ही सर्वांसमोर एकमेकांना आपलंसं करता आणि ही बंधनं मनाला एक आधार देतात."
advertisement
ती पुढे म्हणाली, “मला लिव्ह इन रिलेशनशिप कधीच आवडलं नाही. जर मला ते आवडलं असतं, तर माझं आयुष्य आज वेगळं असतं.”
ती हसत म्हणाली, “लिव्ह इनमध्ये जाणं म्हणजे नकळत स्वतःची फसवणूक करून घेणं आहे. एकदा फसलो की फसलो. त्यामुळे मी तर लिव्ह इनचा सल्ला देणार नाही.”
तेजश्रीने ‘मॅट्रिमोनियल साइट्स’ आणि ‘डेटिंग अॅप्स’वरही आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “आजकाल या साइट्स एक बिझनेस बनल्या आहेत. रोज हजारो नावं यात नोंदवली जातात, पण त्यात किती सत्य आहे, याची खात्री नसते.”
ती पुढे म्हणाली, “अनेक लोक ‘ट्रायल अँड एरर’च्या मानसिकतेत असतात, पण नात्याची सुरुवातच जबाबदारीने झाली पाहिजे. डेटिंग ॲप्सवर एकट्याने भेटण्याऐवजी, पहिली भेट कुटुंबासोबत का होऊ नये?”
तेजश्री सध्या ‘विण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत अभिनेता सुबोध भावेसोबत काम करत आहे. तिच्या या परखड मतांमुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत.