आयुष्यमान खुराना बॅालिवूडमध्ये 13 वर्षांपासून काम करत आहे. त्याने या तेरा वर्षात खूप चांगले सिनेमे चाहत्यांना दिले आहेत. त्याच्या करियरमध्ये पहिल्यांदा अशी संधी आली की, त्याचा हा 'थामा' सिनेमा दिवाळीमध्ये रिलीज झाला आहे. हा हॅारर सिनेमा आहे. आयुष्यमानसोबत या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी, रश्मिका मंदाना दिसत आहे. आयुष्यमानने नवाजपेक्षा चांगल काम केले आहे, तर काहींचं म्हणणं आहे नवाजुद्दीन सिद्दीकी हा अभिनयात आयुष्यमानच्या वरचढ आहे. दोघांच्या अभिनयाबाबत तर सगळेच बोलत आहेत. पण संपत्तीच्या बाबतीत दोघांमध्ये कोण वरचढ आहे माहितीये?
advertisement
आयुष्यमान खुरानाची संपत्ती
'थामा' या हॅारर सिनेमासाठी आयुष्यमान खुरानाला 8 ते 10 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. सिनेमा चित्रपटगृहात जोरदार गल्ला जमवताना दिसत आहे. आयुष्यमान खुराना हा याच्या अगोदर आर्टिकल 15, बधाई हो, बाला, ड्रीम गर्ल, अंधाधुन आणि शुभ मंगल सावधान या सिनेमांमधून दिसला होता. मीडिया रिपोर्टनुसार, त्याच्याकडे 90 ते 100 कोटी रुपये संपत्ती आहे. मर्सिडीज-मेबैक GLS600, बीएमडब्ल्यू 5 सीरीज, ऑडी ए6, मर्सिडीज-बेंज S-क्लास, अशा लग्जरी कार त्याच्याकडे आहेत. संपत्तीमध्ये मुंबईत 7 बीएचके घरचाही समावेश आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीची संपत्ती
नवाजुद्दीन कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असतो. त्याने खूप हिंदी सिनेमांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. मोठ्या पडद्यासोबतच त्याने ओटीटी वरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. बॅालिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नवाजुद्दीन सिद्दीकीचे नावही घेतले जाते. त्याने थामासाठी 3 ते 4 कोटी रुपये एवढं मानधन घेतले आहे. त्याच्याकडे अंदाजे 160 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोबतच बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीज बेंज सारख्या लग्जरी कारचा तो मालक आहे.
