Thama Movie : आयुष्मान-रश्मिका नाही, 'थामा'मध्ये 'सैयारा' फेम अभिनेत्रीचा मोठा धमाका! हॉरर युनिव्हर्समध्ये धमाकेदार एन्ट्री
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thama Movie : 'थामा' मध्ये आयुष्मान आणि रश्मिका यांच्यापेक्षाही मोठा धमाका एका दुसऱ्याच अभिनेत्रीने केला आहे, ती म्हणजे 'सैयारा' फेम अनीत पड्डा!
मुंबई : मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर युनिव्हर्समधील मोठा सिनेमा थामा नुकताच रिलीज झाला आहे. याआधी या युनिव्हर्समध्ये स्त्री, स्त्री २, भेडिया या सिनेमांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तितकंच घाबरवलंही. अशातच आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा' मध्ये पुढील चित्रपटांची गुपिते लपलेली आहेत!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 'थामा' मध्ये आयुष्मान आणि रश्मिका यांच्यापेक्षाही मोठा धमाका एका दुसऱ्याच अभिनेत्रीने केला आहे, ती म्हणजे 'सैयारा' फेम अनीत पड्डा!
कियारा आडवाणीची जागा घेतली!
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'थामा' मधील एका सीनचा फोटो व्हायरल होत होता, ज्यात अनीत पड्डा जंगलात उभी असल्याचे दिसत होते. तेव्हाच चर्चा होती की, कियारा अडवाणीने माघार घेतल्यामुळे मॅडॉक युनिव्हर्सने आता अनीत पड्डासोबत मोठा करार केला आहे.
advertisement
आता 'थामा' च्या प्रदर्शनासोबतच पुढील मोठ्या चित्रपटाची रिलीज डेट आणि मुख्य अभिनेत्रीचे नावही अधिकृतरीत्या समोर आले आहे. मॅडॉकने कियाराच्या जागी अनीतवर करोडोंचा डाव खेळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
'शक्ती शालिनी'ची तारीख जाहीर!
'X' वर शेअर केलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये 'थामा' मधून पुढील चित्रपटाचा टीझर दाखवण्यात आला आहे. त्यात लिहिले आहे: 'द प्रोटेक्टर, द डिस्ट्रॉयर, द मदर ऑफ ऑल... अनीत पड्डा इन 'शक्ती शालिनी''!
advertisement
THE PROTECTOR
THE DESTROYER
THE MOTHER OF ALL 🔥🔥#AneetPadda #ShaktiShalini #Thamma pic.twitter.com/fQVlsTGKVl
— Rimshika (@Rimi_Shehnaaz) October 21, 2025
या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. 'शक्ती शालिनी' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २४ डिसेंबर, २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ५०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'सैयारा'ची लीड ॲक्ट्रेस आता मॅडॉक हॉरर युनिव्हर्सचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
advertisement
प्रेग्नेंसीमुळे कियाराने सोडला प्रोजेक्ट
'शक्ती शालिनी' मध्ये कियारा आडवाणी लीड रोलमध्ये दिसणार होती, पण आता प्रेग्नेंसीमुळे ती या प्रोजेक्टचा भाग होणार नाही, हे उघड झाले आहे. 'थामा' मध्ये वरुण धवनचा कॅमिओ असल्यामुळे फॅन्ससाठी हे मोठं सरप्राईज ठरलं आहे. या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि वरुण धवन यांसारखे मोठे कलाकार आधीच सामील आहेत आणि आता अनीत पड्डाने धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 5:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Thama Movie : आयुष्मान-रश्मिका नाही, 'थामा'मध्ये 'सैयारा' फेम अभिनेत्रीचा मोठा धमाका! हॉरर युनिव्हर्समध्ये धमाकेदार एन्ट्री