Diwali 2025: आज लक्ष्मी-कुबेर पूजन! रात्री या 5 ठिकाणी दिवे लावायला विसरू नका, स्थिर लक्ष्मी प्राप्ती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Diwali 2025: आज रात्री लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाईल आणि संपूर्ण घरा-दारात दिवे लावले जातील, तसेच दीपदान केले जाईल. दिवाळी ही फक्त दिवे लावण्याचा नव्हे, तर नात्यांना प्रकाशित करण्याचा सण मानला जातो. या दिवशी लक्ष्मी-गणेश पूजनासोबतच कुटुंबात प्रेम, एकजूट आणि कृतज्ञतेची भावना जागृत होते. जिथं दिवे जळतात, तिथं लक्ष्मीचा वास असतो.
advertisement
तुळशीजवळ दिवा - दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीसोबतच तुळशी मातेजवळही दिवा लावावा. तुळशीला भगवान विष्णूंची अर्धांगिनी म्हटलं गेलं आहे. दिवाळीच्या रात्री तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा आणि वैवाहिक सुख वाढते. असं मानलं जातं की, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात स्थायी रूपात निवास करते.
advertisement
advertisement
advertisement
या जागांवर दिवा लावा - दिवाळीच्या रात्री एका सुनसान जागी दिवा अवश्य लावावा. आज रात्री अशा ठिकाणी दिवा अवश्य लावा जिथे अंधार आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अंधारही दूर होतो. त्याचबरोबर स्वयंपाकघराला अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले गेले आहे. येथे दिवा लावल्याने अन्न आणि समृद्धीची वाढ होते.
advertisement
या जागांवर अंधार ठेवू नका - दिवाळीच्या दिवशी घरातील देव्हाऱ्यात घराच्या मुख्य दारावरही दिवा अवश्य लावावा. माता लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यासाठी स्वच्छ आणि प्रकाशमय मार्ग हवा असतो. त्यामुळे घराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा लावणे अनिवार्य मानले गेले आहे. तसेच, जिथे तुम्ही पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवता, तिथेही दिवा लावणे सर्वात शुभ असते. हे स्थान लक्ष्मीचे स्थायी निवासस्थान मानलं जातं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)