मुलीच्या छेडछाडीनंतर दोन गटात वाद, काशीमिरात २० रिक्षांची तोडफोड, सरनाईक घटनास्थळी

Last Updated:

काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते. त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या.

प्रताप सरनाईक यांची घटनास्थळी भेट
प्रताप सरनाईक यांची घटनास्थळी भेट
मीरा भाईंदर : काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे काल रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर आज सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते. त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन उपद्रव माजविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहोचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले.
advertisement
तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. उपद्रव माजविणाऱ्यांविरोधात कोणतीही गय केली जाणार नाही, त्यांना कायद्याने धडा शिकवू, असे सरनाईक म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलीच्या छेडछाडीनंतर दोन गटात वाद, काशीमिरात २० रिक्षांची तोडफोड, सरनाईक घटनास्थळी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement