'पुष्पराज' ही खरी आग आहे, हे अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 'पुष्पा द राइज' रिलीज झाल्यानंतर 3 वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. जिथे पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पायरसी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.
advertisement
निर्मात्यांना बसणार फटका?
ट्रेड एक्स्पर्ट्स याकडे मोठे नुकसान म्हणून पाहत आहेत आणि यामुळे निर्मात्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. वास्तविक, 'पुष्पा 2' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल जात आहेत, त्यामुळे अनेक प्रेक्षकांना चित्रपटाचे तिकीट मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांना 'पुष्पा 2' फुकट बघायला मिळाला तर ते थिएटरमध्ये जाणार नाहीत. प्रेक्षक 'पुष्पा 2' पाहण्यासाठी आतुर झाले असताना, त्याचे लीक होणे निर्मात्यांसाठी अतिशय वाईट आहे.
Pushpa 2 चा खलनायक करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, 'भाभी'सोबत करणार रोमान्स, इम्तियाज अलीची घोषणा!
पुष्पा 2 कुठे लीक झाला?
रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 Ibomma, Movierulz, Tamilrockers, Filmyzilla, Tamilyogi, Tamilblasters, Bolly4U, Jaisha Movies, 9xMovies आणि Moviesda सारख्या पायरसी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. अहवालात 'पुष्पा 2 द रुल मूव्ही डाउनलोड', 'पुष्पा 2 द रुल मूव्ही एचडी डाउनलोड', 'पुष्पा 2 द रुल तमिलरॉकर्स', 'पुष्पा 2 द रुल फिल्मझिला', 'पुष्पा 2 द रुल टेलिग्राम लिंक' आणि त्यानंतर गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा 2 द रुल मूव्ही फ्री एचडी डाउनलोड'ची हे किवर्ड्स ऑनलाइन सर्चमध्ये ट्रेंडिंग होते.
Mythri Movie Makers आणि Muttamsetti Media द्वारे निर्मित, 'पुष्पा 2' खूपच थरारक आहे. न्यूज18 ने चित्रपटाला 5/5 स्टार दिले आहेत. चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये या कथेचे रंजक वर्णन करण्यात आले आहे. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे त्यातील संवाद. जो इतर कोणत्याही चित्रपटाच्या तुलनेत खूपच प्रभावी आहे. अल्लू अर्जुन, त्याच्या शैली आणि स्क्रीन प्रेझेंससाठी ओळखला जातो, तो पुष्पा राजच्या भूमिकेत सर्वोत्तम आहे.