Pushpa 2 चा खलनायक करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, 'भाभी'सोबत करणार रोमान्स, इम्तियाज अलीची घोषणा!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अशी बातमी आहे की लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अलीने फहादला त्याच्या आगामी चित्रपटासाठी विचारले आहे.
Fahadh Faasil Bollywood Debut : सध्या सगळीकडे फक्त पुष्पा २ या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. गुरूवारी ५ डिसेंबरला संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिलीजच्या आधीच या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
advertisement
पुष्पा या चित्रपटात अभिनेता फहाद फासिल पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आता लवकरच तो पुष्पा २ मध्ये दिसणार आहे. आता लवकरच फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशी बातमी आहे की लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अलीने फहादला त्याच्या आगामी चित्रपटासाठी विचारले आहे. दरम्यान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नावही समोर आले आहे.
advertisement
नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, इम्तियाज अली 'ॲनिमल' फेम नॅशनल क्रश म्हणजेच तृप्ती दिमरीला त्याच्या चित्रपटात फहादसोबत कास्ट करणार आहे. इम्तियाज केवळ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेणार नाही, तर तो या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून केवळ इम्तियाजच नाही तर फहाद आणि तृप्तीच्या चाहत्यांनाही ही कथा कशी असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
advertisement
वृत्तांनुसार, या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता निर्मात्यांनी फहद आणि तृप्तीला चित्रपटासाठी फायनल केले आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला अंतिम टच बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 5:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 चा खलनायक करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, 'भाभी'सोबत करणार रोमान्स, इम्तियाज अलीची घोषणा!