24 वर्षांपूर्वीची हा हॉरर शो पाहून आजही येतो अंगावर काटा
24 वर्षांपूर्वी हा हॉरर शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोचं नाव ऐकताचं त्याची भीतीदायक कथा लगेच आठवते. 'आप बीती' असं या मालिकेचं नाव आहे. दूरदर्शनवर ही मालिका दाखवली जात असे. 'महाभारत'च्या बी. आर. चोप्रा यांचा हा हॉरर शो रक्तरंजित आणि भयानक गोष्टींवर आधारित होता. प्रेक्षकांनी या मालिकेवर इतकं प्रेम केलं की आजही त्याच्या कथा आणि त्यातले कलाकार विसरले गेलेले नाहीत. या हॉरर शोची IMDb रेटिंग 7.6 आहे. या मालिकेत आयुष पांडे, अनंग देसाई, वाणी त्रिपाठी आणि निशिगंधा वाड हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
advertisement
New On Netflix : 15 ते 30 ऑक्टोबर नेटफ्लिक्सवर पैसा वसूल Entertainment! रिलीज होत आहेत जबरदस्त मूव्ही अन् वेब सीरिज, ही घ्या लिस्ट
'आप बीती' कुठे पाहू शकता?
'आप बीती' ही एक अलौकिक हॉरर सीरीज होती. जी बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म्सने या मालिकेची निर्मिती केली होती. रवि चोप्रा यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या अलौकिक घटनांची गोष्ट दाखवली जात होती.'आप बीती' या नावाने 1948 मध्ये एक बॉलिवूड चित्रपटही आला होता. कुमार स्टुडिओने या चित्रपटाची निर्मती केली होती. 'आप बीती' हा हॉरर शो आता यूट्यूबवर उपलब्ध आहे.
धडकी भरवणाऱ्या कथा
'आप बीती' या हॉरर शोमध्ये अशा अनेक भुताटकी कथा दाखवण्यात आल्या ज्या फक्त ऐकूनच भीती वाटायला लागते. त्याकाळी या शोने प्रेक्षकांच्या मनात जबरदस्त स्थान मिळवलं होतं. कारण त्यात खर्या अर्थानं भितीदायक अनुभव दाखवले जात होते. आजही इंस्टाग्रामवर या मालिकेच्या टायटल साँगचे व्हिडीओ व्हायरल होतात. 5 जानेवारी 2001 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता.