सीताफळाची शेती करण्यासाठी शेणखत तसेच रासायनिक खताचा देखील वापर केला जातो. तसेच या फळावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी केली जाते. इतर शेतकऱ्यांनी सीताफळाची लागवड करायची झाल्यास सर्वप्रथम जमिनीची नांगरणी करून घ्यावी, रोटावेटर करावे, शेण खताचा वापर करावा, रासायनिक खताचा वापर कमी केला तरी काही हरकत नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणारे हे फळ आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने याची लागवड करायला पाहिजे.
advertisement
साधारणपणे सीताफळ शेती करण्यासाठी 1 एकरसाठी 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च येतो, या फळाचे पीक घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता फार भासत नाही. नैसर्गिक पडलेल्या पावसामुळे जमीन सुपीक होते, त्यावर देखील सीताफळाची लागवड केल्यास फळ चांगले बहरते तसेच उन्हाळ्यात देखील या फळाला पाण्याची गरज नसते त्यामुळे सीताफळ नेहमी भरघोस उत्पादन आणि उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे प्रत्येकाने ठरवले तर पारंपरिक शेती करत असताना 1 एकर किंवा 2 एकरमध्ये सीताफळाची आवश्यक लागवड करावी, असे देखील घावटे यांनी म्हटले आहे.