TRENDING:

TV च्या स्टार कपलची कोट्यवधींची फसवणूक, जवळच्या मित्रानेच केलं कंगाल, रडून झाली वाईट अवस्था!

Last Updated:

TV star Financial fraud : टीव्ही इंडस्ट्रीमधील एक परफेक्ट कपल म्हणून ओळखली जाणारी पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांच्यासोबत खूप भयानक गोष्ट घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधील एक परफेक्ट कपल म्हणून ओळखली जाणारी पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांच्यासोबत खूप भयानक गोष्ट घडली आहे. त्यांच्या जवळच्याच मित्राने त्यांना फसवलं आहे. ज्यामुळे त्यांची सर्व जमापुंजी संपली असून त्यांना पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.
TV च्या स्टार कपलची कोट्यवधींची फसवणूक
TV च्या स्टार कपलची कोट्यवधींची फसवणूक
advertisement

दोघं आर्थिक फसवणुकीला बळी पडले आणि त्यांची संपूर्ण सेविंग्स संपली आहे. ही फसवणूक त्यांच्या जवळच्या मित्रानेच केली आहे. कुणालने सांगितले, "ती व्यक्ती आमच्या घरातली झाली होती... तिच्यावर 3 वर्षांपासून विश्वास होता." पण नेमकं तिथंच त्यांच्या आयुष्याचं गणित बिघडलं. जवळच्या व्यक्तीकडून गद्दारी होणं ही भावना इतकी खोल असते की पैसा गमावल्यापेक्षा मनाला लागलेली जखम जास्त असते.

advertisement

'सलमान माझा मित्र नाही, त्याचं वागणं त्रासदायक वाटायचं...' सोनाली बेंद्रे असं का म्हणाली?

या घटनेनंतर पूजा आणि कुणाल अत्यंत कोलमडून गेले होते. कुणालने सांगितले की, "आम्ही खूप रडलो आहोत. गेल्या महिन्यात तर पार कोलमडून गेलो होतो. आम्हाला केवळ पाठिंबा हवा आहे." सुरुवातीला आपल्या कुटुंबाला या घटनेबद्दल सांगणे कठीण वाटले, कारण त्यांना अशा बातमीने धक्का बसेल अशी भीती होती. "आम्ही आयुष्यभर प्रचंड मेहनत करून हे पैसे कमावले होते," असे कुणाल म्हणाला.

advertisement

पूजा बॅनर्जी ही टीव्ही विश्वातील एक ओळखीचा चेहरा आहे. तिने 'कहानी घर घर की', 'करम अपना अपना', 'कस्तूरी', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'सर्वगुण संपन्न', 'देवों के देव महादेव', 'कुबूल है' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. 2020 मध्ये तिने कुणाल वर्मासोबत लग्न केले आणि 2021 मध्ये त्यांना एक गोंडस बाळ झाले. वैयक्तिक आयुष्यात आनंदी असलेल्या या जोडप्याला आता या अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
TV च्या स्टार कपलची कोट्यवधींची फसवणूक, जवळच्या मित्रानेच केलं कंगाल, रडून झाली वाईट अवस्था!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल