Sonali Bendre On Salman Khan: 'सलमान माझा मित्र नाही, त्याचं वागणं त्रासदायक वाटायचं...' सोनाली बेंद्रे असं का म्हणाली?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sonali Bendre : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जी आजही तिच्या सौंदर्याने लोकांना घायाळ करते. लोक आजही तिच्यासाठी वेडे आहेत. ही लोकप्रिय अभिनेत्री आहे सोनाली बेंद्रे.
मुंबई: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जी आजही तिच्या सौंदर्याने लोकांना घायाळ करते. लोक आजही तिच्यासाठी वेडे आहेत. ही लोकप्रिय अभिनेत्री आहे सोनाली बेंद्रे. ती सध्या चर्चेत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे, सलमान खान आणि बॉलिवूडविषयी बोलली. तिची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोनालीने सांगितले की, सलमान खान तिचा मित्र नाही. याशिवाय तिने हम साथ साथ है सिनेमाच्या सेटवरच्या त्यांच्या बॉन्डिंगविषयी देखील सांगितले. अभिनेत्री नेमके काय म्हणाली? याविषयी जाणून घेऊया. एनआयला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी खुलासा केला.
1999 मध्ये आलेल्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटात सोनाली बेंद्रे आणि सलमान खानने एकत्र काम केले होते. तेव्हा त्यांची फारशी मैत्री नव्हती. उलट सोनालीने सांगितले की, “मला सलमान फारसा आवडायचा नाही. आम्ही फारसे बोलत नव्हतो. तो अधूनमधून माझे फोटो अचानक काढायचा, काही वेळा भांडणही व्हायची.” तिने असेही म्हटले की, सलमान त्या काळात थोडासा खोडकर होता आणि त्याचे वागणे कधीकधी त्रासदायक वाटायचे. त्यामुळे त्यांच्यात फारशी मैत्री झाली नाही.
advertisement
पण एका प्रसंगाने सगळे बदलले...
वर्षांनंतर जेव्हा सोनालीला गंभीर कर्करोग झाला, तेव्हा सलमानची खरी ओळख तिला समजली. न्यू यॉर्कमध्ये उपचार सुरू असताना सलमान तिला भेटायला दोन वेळा गेला. एवढेच नाही तर तो सोनालीच्या पती गोल्डी बेहलला वारंवार कॉल करून विचारपूस करत असे. डॉक्टर कोण आहेत, इलाज कसा सुरू आहे, अजून चांगला पर्याय मिळू शकतो का, अशा अनेक गोष्टींमध्ये तो सहभागी होता.
advertisement
सोनाली म्हणाली, “सलमानने इतकी काळजी घेतली की मी चकित झाले. त्याला माझी तब्येत चांगली व्हावी, यासाठी तो खूप प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला खात्री झाली की मी उत्तम डॉक्टरांकडे उपचार घेत आहे, तेव्हा तो थोडा शांत झाला.” सोनालीने पुढे सांगितले की, “तो जरी बाहेरून थोडासा उद्धट वाटत असला, तरी आतून तो खूप नाजूक आणि काळजी घेणारा आहे. आज मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटतो. मला त्याच्या काही गोष्टी खटकत होत्या, पण आता त्याच्या या दुसऱ्या बाजूकडे पाहून मी भारावून गेले आहे.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 10, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sonali Bendre On Salman Khan: 'सलमान माझा मित्र नाही, त्याचं वागणं त्रासदायक वाटायचं...' सोनाली बेंद्रे असं का म्हणाली?