छावा चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदान्ना त्याची पत्नी येसूबाईची भूमिका साकारलीय. तर अक्षय खन्ना मुघल शासक औरंगजेबाची भूमिका साकारली. डायना पेंटी औरंगजेबाच्या मुलीची भूमिका साकारत आहे तर विनीत संभाजी महाराजांचे मित्र कवी कलशची भूमिका साकारत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट विकीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला आहे.
advertisement
Chhaava: सिंहाचा जबडा फाडणारा एकच...'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, VIDEO व्हायरल
'छावा' हा या वर्षातील पहिला बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी तुफान कमाई केली आहे. 'छावा' च्या दोन दिवसांच्या कलेक्शनने लोकांना आश्चर्यचकित केले. विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, 'छावा'ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याचे कलेक्शन 36.5 कोटी रुपये होते.
चित्रपटाने आतापर्यंत 67.5 कोटी रुपये कमावले आहेत. निर्मात्यांचे म्हणणे आहे की या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपये कमावले आहेत.'छावा' हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने पुणे आणि मुंबईत सर्वाधिक कमाई केली. छावाच्या कलेक्शनच्या गर्जनेने दिसत आहे की तो तिसऱ्या दिवशी 100 कोटींचं कलेक्शन करेल.