Chhaava: सिंहाचा जबडा फाडणारा एकच...'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, VIDEO व्हायरल

Last Updated:

Chhaava:विकी कौशल, रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. बहुप्रतिक्षित सिनेमाने थिएटरमध्ये एन्ट्री करताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली.

'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, VIDEO व्हायरल
'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, VIDEO व्हायरल
मुंबई : विकी कौशल, रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. बहुप्रतिक्षित सिनेमाने थिएटरमध्ये एन्ट्री करताच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. सिनेमा पाहून अक्षरशः प्रेक्षकांचे डोळे पाणावले. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं तर भरभरून कौतुक होत असून त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना तर स्तब्धच करून सोडलं. लोक विकी कौशलच्या 'छावा'च्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक करत आहेत. हा व्हिडिओ विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षाची कहाणी 'छावा'मधून दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा पाहून प्रेक्षक भारावरून गेले. विकीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये लोक 'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करत आहेत.
विकीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही लोक 'छावा'च्या पोस्टरवर चढून दुग्धाभिषेक करत आहेत. मुलगा मोठमोठ्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणा देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच विकीने त्याच्या इंस्टाग्रामवरही हा व्हिडिओ शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिलं, 'छत्रपति संभाजी महाराज की जय!'.
advertisement
या व्हिडिओवर अनेक कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पहायला मिळत आहे. अनेकांनी म्हटलं, "अंगावर काटा आला. अभिमान आहे अहमी या जन्म भूमी मध्ये जन्मलो", "जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे", "विकी भाऊ बघितले ना मराठ्यांचं प्रेम", "अक्षरशः रडलो सर खूपच छान", "तन धन जीवन समर्पित माझ्या राजांसाठी", अशा अनेक कमेंट पोस्टवर पहायला मिळत आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरचा 'छावा' सिनेमा सध्या खूपच चर्चेत असून लोकांच्या पसंतीस उतरत आहे. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, 'छवा'ने भारतात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 36.5 कोटी कमावले आहेत. त्यामुळे सिनेमा तुफान वेगाने बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava: सिंहाचा जबडा फाडणारा एकच...'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement