विशालला सुट्टी घालवण्यासाठई कंबोडियाला पाठविण्यात येणार होते. पण परतीच्या प्रवासादरम्यान त्याला एक ट्रॉली बॅग सोबत घेऊन येण्यास सांगितले. ही ट्रॉली बॅग पूर्णपणे ड्रग्जने भरलेली होती. यासगळ्या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न अधिकारी सध्या करत आहेत.
Jannar Zubair : जन्नत जुबैरच्या सौंदर्यावर 50 मिलियन लोक का फिदा? 'या' 10 फोटोंमध्ये दडलंय उत्तर
advertisement
कोण आहे विशाल ब्रह्मा?
विशाल ब्रह्मा 2019 मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता. सम्राट असं त्याच्या भूमिकेचं नाव होतं. चित्रपटात त्याने एका महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारली होती. टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेसोबत त्याने काम केलंय. चित्रपटात विशालची सहाय्यक भूमिका असली तरी त्याचं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं होतं. आजवर अनेक कलाकृतींचा तो भाग राहिला आहे. पण इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करता मात्र आलेलं नाही.
विशाल सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रीय आहे. जिम, वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. विशालला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. बॉलिवूडमध्ये स्ट्रगल सुरू असलेल्या विशालचा आता ड्रग्जप्रकरणानंतर आणखी संघर्ष वाढणार का? त्यातून तो कसं कमबॅक करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.