स्नेहा चव्हाण १० नोव्हेंबरला मानससोबत विवाहबंधनात अडकली. अगदी साध्या घरगुती समारंभात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. ज्यामध्ये तिचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळीच उपस्थित होते. यावेळी तिने गडद जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचं ब्लाऊज असा पेहराव केला होता. तिचा पती मानसने यावेळी लेव्हेंडर रंगाची शेरवाणी घातली होती.
प्राजक्ता माळीने सांगितली Special Date, पोस्ट शेअर करत म्हणाली, "एका महिन्यानंतर..."
advertisement
स्नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे भरपूर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अनेकांनी तिला तिच्या नव्या प्रवासाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र नेटकऱ्यांनी तिला आणि तिच्या पतीला ट्रोल करत आहेत. स्नेहाच्या पती मानसला त्याच्या दिसण्यावरून आणि स्नेहाला तिच्या दुसऱ्या लग्नामुळे ट्रोल केलं जात आहे.
अनेक यूजर्सनी तिच्या पोस्टवर काही आक्षेपार्ह्य कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं, पुन्हा एकदा अभिनंदन. तर दुसऱ्याने म्हटलं, हा कट्टपा कोण आता. तिसऱ्याने लिहीलं आहे, मॅडम आता हॅट्रिक तर झालीच पाहिजे. आणखी एकाने लिहलंय, पुन्हा एकदा हनिमून च्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारच्या अनेक कमेंट त्या पोस्टवर आहेत.
स्नेहाचे पहिले लग्न हे अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर झाले होते. लग्नाच्या 2-3 महिन्यातच त्यांच्यात वाद झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत पैशांची मागणी केली होती. स्नेहाने अनिकेतच्या आईवर मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. अनिकेतने मात्र हे सगळे आरोप फेटाळले होते.