अल्लू अर्जुनला का अटक करण्यात आली?
“पुष्पा 2” च्या स्क्रीनिंग दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका महिलेला पायदळी तुडवल्याप्रकरणी पॅन इंडियाचा स्टार अल्लू अर्जुन याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 प्रदर्शित झाला. पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच संदर्भात अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणीच पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अल्लू अर्जुन पोलिसांना न सांगता प्रीमियरला गेला होता, असा पोलिसांचा आरोप आहे.
advertisement
अल्लू अर्जुनचे नाव एफआयआरमध्ये आहे की नाही? पोलिसांनी हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द रुल'च्या स्क्रिनिंगदरम्यान रेवती नावाच्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. पुष्पा स्टार अल्लू अर्जुनचेही नाव पोलिस एफआयआरमध्ये आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 5 डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अल्लूच्या आधी कोणाला अटक झाली? अल्लू अर्जुनच्या आधी, पोलिसांनी थिएटरच्या मालकांपैकी एकाला, त्याचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि खालच्या बाल्कनीच्या प्रभारीला अटक केली आहे. अल्लू अर्जुनची अटक अशा वेळी झाली आहे जेव्हा त्याने एफआयआर रद्द करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अभिनेता अर्जुनने महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.
अल्लू अर्जुन कोर्टात का पोहोचला? अटक टाळण्यासाठी अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली. अल्लू अर्जुनने बुधवारी तेलंगणा उच्च न्यायालयात हैदराबाद चेंगराचेंगरीप्रकरणी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली. या प्रकरणावर उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी झालेली नाही.
Allu Arjun Arrest: अल्लू अर्जुनच्या अटकेमागे राजकीय कुरघोडी? केटी रामाराव यांचे सरकारवर टिकास्त्र