Allu Arjun Arrest: अल्लू अर्जुनच्या अटकेमागे राजकीय कुरघोडी? केटी रामाराव यांचे सरकारवर टिकास्त्र
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटी रामा राव यांनी अल्लू अर्जुनवरील पोलिस कारवाईबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ अभिनेता अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, भारत राष्ट्र समितीचे (BRS) कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी आज अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा 2: द राइज' या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी त्याला झालेल्या अटकेविरोधात जोरदार टीका केली. अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आणि पोलिस वाहनातून चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
advertisement
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र केटी रामा राव यांनी अल्लू अर्जुनवरील पोलिस कारवाईबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. इतकंच नाही, तर त्यांनी या अटकेला "सत्ताधाऱ्यांच्या असुरक्षिततेचे" उदाहरण म्हटले.
X वरील एका पोस्टमध्ये, केटी रामा राव यांनी चेंगराचेंगरीतील पीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. परंतु या शोकांतिकेला खरोखर जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांना यावेळी उपस्थित केला.
advertisement
केटी रामा राव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, "राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्टार अल्लू अर्जुनची अटक म्हणजे राज्यकर्त्यांच्या असुरक्षिततेचा कळस! मला चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे, पण त्यात खरी चूक कोणाची आहे?"
"अल्लू अर्जुन गरूला एक सामान्य गुन्हेगार म्हणून वागणूक देणे अयोग्य आहे. विशेषतः ज्यासाठी तो थेट जबाबदार नाही अशा गोष्टींसाठी. आदर आणि सन्माननीय वर्तनासाठी नेहमीच जागा असते. मी सरकारी यंत्रणांच्या वागणुकीचा तीव्र निषेध करतो," असं ते पुढे म्हणाले.
advertisement
हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी साऊथ सुपरस्टार आणि 'पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2024 4:20 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun Arrest: अल्लू अर्जुनच्या अटकेमागे राजकीय कुरघोडी? केटी रामाराव यांचे सरकारवर टिकास्त्र