TRENDING:

जितेंद्र जोशी-सुबोध भावेनंतर 'हा' अभिनेता साकारणार संत तुकारामांची भुमिका, अखेर नाव समोर

Last Updated:

Abhang Tukaram : 'अभंग तुकाराम' हा सिनेमा 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी आणि सुबोध भावेनंतर कोणता अभिनेता तुकारामांच्या भुमिकेत दिसणार हे समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या सिनेमाची काही दिवसांआधीच घोषणा करण्याच आली. तेव्हापासूनच या सिनेमात संत तुकारामांची भुमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता होती. कारण याआधीच अभिनेता जितेंद्र जोशी यानं 'तुकाराम' या सिनेमात ही भूमिका साकारली होती. या सिनेमाचं आणि जितेंद्रच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. त्यानंतर काही दिवसांआधीच अभिनेता सुबोध भावेचा संत तुकाराम नावाचा हिंदी सिनेमा रिलीज झाला. ज्यात सुबोध भावेनं संत तुकाराम साकारले होते.  त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर संत तुकारामांचा सिनेमा येणार म्हटल्यावर तुकारामांची भुमिका कोण साकारणार हा चर्चेचा विषय होता. अखेर ते नाव आणि चेहरा समोर आला आहे.
News18
News18
advertisement

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगरूपी अमृतवाणीने जीवनाची शाश्वत सत्ये सांगितली आणि जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले. मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता 'अभंग तुकाराम' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर या सिनेमाचं दिग्दर्शित करणार आहेत.  7 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.  आपल्या भेटीला येणार आहे.

advertisement

( Tejashri Pradhan Education : नेहमी देते मोटिवेशनल डोस, तेजश्री प्रधानचं शिक्षण तरी किती? )

कोण साकारणार संत तुकाराम?

'अभंग तुकाराम' या सिनेमात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.

अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकार श्री क्षेत्र देहू येथे एकत्र आले होते. डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या असा वेष परिधान करून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेच्या रूपातील दर्शन यावेळी दिलं.

advertisement

'अभंग तुकाराम' या सिनेमाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांची असून,  दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल 10 अभंगांचा समावेश या सिनेमात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे.

advertisement

सिनेमाची स्टारकास्ट 

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी , अजय पुरकर, अवधूत गांधी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचन्द्र, नुपूर दैठणकर, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे, तेजस बर्वे आदि कलाकार या सिनेमात झळकणार आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
जितेंद्र जोशी-सुबोध भावेनंतर 'हा' अभिनेता साकारणार संत तुकारामांची भुमिका, अखेर नाव समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल