अंकिता वालावलकरला 'धुरंधर' चित्रपट खूप आवडला आहे. तिने अक्षय खन्नाच्या अरेबिक गाण्यावरील व्हायरल एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर करत खास पोस्ट लिहिली. अंकिता म्हणते, "माझा विश्वास ठेवा... 'धुरंधर' पाहणे म्हणजे Worth Every Minute! चित्रपट पाहताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, कारण यातला प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे."
advertisement
चित्रपट चांगला असल्यामुळेच तो प्रेक्षकांना आवडत आहे, पण याच चित्रपटाशी संबंधित एक ट्रेंड सोशल मीडियावर सध्या तुफान गाजतोय, ज्यामुळे अंकिता नाराज झाली आहे.
Day 1 As a Spy ट्रेंडवर अंकिता वालावलकरचा संताप
धुरंधर या सिनेमाची सध्या इतकी क्रेझ सुरू आहे, की या चित्रपटाशी निगडीत अनेक ट्रेंड सुरू झाले आहेत. यातीलच एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे 'Day 1 As a Spy.' यामध्ये इन्फ्लूएन्सर स्वतःला सीक्रेट एजन्ट दाखवत पाकिस्तानात मिशनसाठी आल्याचे सांगतात. मात्र साध्या सवयी जसे की, कोणाला पाय लागला की पाया पडणे, गायीला नमस्कार करणे, ट्राफिक पोलिसांनी पकडल्यावर त्यांना साहेब-मामा म्हणून हाक मारणे यामुळे ते पहिल्याच दिवशी पकडले जातात. सोशल मीडियावर हा ट्रेंड सध्या तुफान गाजतोय. पण अंकिता वालावलकरला हा ट्रेंड अजिबात पटला नसून तिने अशा प्रकारच्या रील्स बनवणाऱ्यांना चांगलंच झापलं आहे.
अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय, "Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे. त्यांचं आयुष्य कंटेंट नाही, तो दररोजचा धोका आहे. थोड्या views साठी देशासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांची थट्टा करणं हे IQ नाही, हे संवेदनशून्यपणाचं प्रदर्शन आहे. Spy बनायला फक्त attitude नाही तर, मेंदू, धैर्य आणि त्याग लागतो. तुमच्या reels मुळे चित्रपट promote होतील, पण त्यामागे असलेली देशसेवा, देशासाठी जगणाऱ्यांची किंमत कमी होतेय हे लक्षात ठेवा. एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला."
अंकिताने पुढे लिहिलंय, 'Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी.' अंकिताच्या या व्हिडीओमधून तिची भारतीय सैन्याप्रती असलेली तळमळ स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट करत तिला समर्थन दिले आहे. अंकिताने सांगितलेली ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. देशासाठी स्वतःची ओळख विसरून लढणाऱ्या सैनिकांचं आयुष्य आपल्यासाठी इतकं किरकोळ आहे का याचं प्रत्येकाने भान राखायला हवं.
