Dhurandhar: रहमान डकैतच्या भयानक एन्काऊंटरनंतर, Ilyas Kashmiri चं काय झालं? कोणी केला 26/11 च्या हँडलरचा खात्मा

Last Updated:
Who killed Ilyas Kashmiri: इलियास कश्मीरी अल-कायदाशी जोडलेला एक अत्यंत हाय-प्रोफाइल पाकिस्तानी कमांडर होता. भारतावर आणि पाश्चात्त्य देशांवर अनेक मोठे हल्ले घडवून आणण्यात या क्रूर दहशतवाद्याचा हात होता.
1/10
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटात ज्या पद्धतीने भारताचे गुप्तहेर एजंट खतरनाक दहशतवाद्यांना त्यांच्या हद्दीत घुसून संपवतात, तशाच एका एका कुख्यात दहशतवाद्याच्या थरारक एन्काऊंटरची आठवण ताजी झाली आहे.

advertisement
2/10
हा दहशतवादी म्हणजे इलियास कश्मीरी, जो अल-कायदाशी जोडलेला एक अत्यंत हाय-प्रोफाइल पाकिस्तानी कमांडर होता. भारतावर आणि पाश्चात्त्य देशांवर अनेक मोठे हल्ले घडवून आणणाऱ्या या क्रूर दहशतवाद्याचा शेवटही अत्यंत नाट्यमय आणि गुप्त पद्धतीने झाला.

3/10
'हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी' या त्याच्या संघटनेच्या प्रवक्त्याने फॅक्सद्वारे पाकिस्तानी माध्यमांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली, पण त्याचवेळी त्याने बदला घेण्याची शपथही घेतली.

4/10
इलियास कश्मीरी हा त्या काळात सर्वात धोकादायक आणि सक्रिय दहशतवादी नेत्यांपैकी एक होता. २६/११ मुंबई हल्ल्याच्या सर्व घातक योजनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे मानले जाते. त्याने 'HuJI' चे नेतृत्व करत '३१३ ब्रिगेड' नावाचे विशेष युनिट हाय-प्रोफाइल मिशनसाठी तयार केले होते.

5/10
२००६ मध्ये कराचीतील अमेरिकेच्या दूतावासावरील आत्मघाती हल्ला आणि २०११ मध्ये मेहरान नौदल हवाई तळावरील हल्ला, यामागे कश्मीरीचाच हात होता.

6/10
त्याच्या क्रूरतेची सीमा म्हणजे २००० मध्ये LOC जवळ भाऊसाहेब मारुती तळेकर या भारतीय जवानाचे त्याने केलेले शिरच्छेद! या क्रूर कृत्यासाठी तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्याला कथितरित्या बक्षीस दिले होते.

7/10
विशेष म्हणजे, ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर, अल-कायदाचा संभाव्य वारसदार म्हणून कश्मीरीकडे पाहिले जात होते. अमेरिकेने त्याच्या माहितीसाठी ५० लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते, जे त्याच्या मृत्यूनंतर काढून टाकण्यात आले.

8/10
३ जून २०११ रोजी पाकिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तान आदिवासी भागात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इलियास कश्मीरी ठार झाला. त्याच्या मृत्यूचा तपशील खूपच धक्कादायक आहे.

9/10
कश्मीरी आणि त्याचे साथीदार घवा ख्वा नावाच्या एका गावात होते. नेमक्या त्याच वेळी अमेरिकेच्या एका ड्रोनने दोन मिसाइल्सने अचूक लक्ष्य साधले. या हल्ल्यात कश्मीरीसह एकूण नऊ लोक ठार झाले.

10/10
'धुरंधर' चित्रपटात जवानांचे शौर्य आणि देशाचे शत्रू उखडून टाकण्याची जिद्द दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात दाखवण्यात आल्याप्रमाणे कुख्यात गँगस्टर रहमान डकैतचा शेवटही त्याच ॲक्शन-पॅक्ड पद्धतीने झाला.

Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement