Pneumonia Symptoms: हवा बिघडली, 'वॉकिंग न्यूमोनिया'चं संकट वाढलं? सकाळी या चुका टाळा!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Pneumonia Symptoms: वाढती थंडी आणि वाढणाऱ्या विविध आजार कालांतराने दुर्लक्ष केलं जात.वातावरण बदलामुळे साहजिकच थंडी ताप आणि सर्दी होते. जास्तवेळ अंगावरच आजार न मारता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच लक्षणे जाणून घ्या...
वाढती थंडी आणि वाढणाऱ्या विविध आजार कालांतराने दुर्लक्ष केलं जात.वातावरण बदलामुळे साहजिकच थंडी ताप आणि सर्दी होते. जास्तवेळ अंगावरच आजार न मारता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच लक्षणे जाणून घ्या, बऱ्याच शहरांत हवेची गुणवत्ता खालावली - असून लोकांत विविध आजार उद्भवताना दिसत आहेत.
प्रदूषण तसेच अनेक संसर्गातून मायकोप्लाइमा न्यूमोनिया नावाच्या जिवाणूमुळे निरोगी व्यक्ती, विशेष करून मुले व तरुणांना 'वॉकिंग न्यूमोनिया' किंवा 'सायलेंट न्यूमोनिया'ची बाधा होते. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, ताप, खोकला आणि थंडी वाजते. हा एक श्वसनमार्गाचा आजार असून तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. डॉ उज्वला चौधरी यानी उपाय कारणे आणि काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगितली आहे.
advertisement
पुरेशी झोप आणि पाण्याचे सेवन. शिंक-खोकल्यावेळी टिश्यूचा वापर. वारंवार हात धुणे वार्षिक फ्लू लस, तसेच पीव्हीसी आणि पीपीएसव्ही लसींचा फायदा. धूरकट, बाहेरील वातावरणात मास्क वापरणे. खोकला दीर्घकाळ टिकत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुख्य लक्षणे: खोकला (कफ किंवा कफ नसलेला), ताप आणि थंडी वाजून येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे, छातीत दुखणे, अशक्तपणा आणि स्नायू दुखणे. कोण अधिक जोखमीमध्ये लहान मुले, वृद्ध, दमा किंवा इतर फुफ्फुसाच्या तक्रारी असलेले रुग्ण, कमी प्रतिकारशक्ती असलेले नागरिक तसेच दाटीच्या ठिकाणी राहणारे, शाळा, कॉलेज, हॉस्टेल, कार्यालये, सार्वजनिक वाहतूक यांत संसर्गाचा धोका अधिक,
advertisement
कारणे आणि लक्षणे काय ?
सततचा कोरडा खोकला- हलका ताप. नाक वाहणे, घसा खवखवणे
डोकेदुखी, शरीरात अशक्तपणा- छातीत ताण किंवा श्वास घेताना हलकी अस्वस्थता अनेकदा हे इतके सौम्य असते की रुग्णाला 'साथी सर्दी' होत असल्याचीच भावना राहते.
उपचार आणि निदान
लक्षणे वाढल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितल्यास अँटिबायोटिकचा कोर्स घ्यावा. काही सौम्य प्रकरणे घरच्या घरी आराम व योग्य काळजीने सुधारतात.
advertisement
काय आहे न्यूमोनिया?
view commentsहा न्यूमोनियाचाच सौम्य प्रकार मानला जातो. रुग्ण साध्या सर्दीप्रमाणे दैनंदिन कामे करत राहतो; म्हणूनच याला 'वॉकिंग' असा उल्लेख करण्यात येतो. दिसायला साधी सर्दी-खोकला, पण आतून फुफ्फुसांवर सूक्ष्म संसर्ग वाढत असतो.यामुळे थंड वातावरणात तेवढीच काळजी घेणे महत्वाचे आहे.
Location :
Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pneumonia Symptoms: हवा बिघडली, 'वॉकिंग न्यूमोनिया'चं संकट वाढलं? सकाळी या चुका टाळा!










