IND vs SA : चौथ्या T20 आधी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर पूर्ण सीरिजमधून बाहेर!

Last Updated:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सीरिजची चौथी टी-20 मॅच बुधवार 17 डिसेंबरला खेळवली जाणार आहे, पण या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

चौथ्या T20 आधी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर पूर्ण सीरिजमधून बाहेर!
चौथ्या T20 आधी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर पूर्ण सीरिजमधून बाहेर!
लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सीरिजची चौथी टी-20 मॅच बुधवार 17 डिसेंबरला खेळवली जाणार आहे, पण या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा मॅच विनर ऑलराऊंडर सीरिजमधून बाहेर झाला आहे, या खेळाडूच्या बदल्यात बीसीसीआयने बदली खेळाडूचीही घोषणा केली आहे. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला, त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय टीमने कमबॅक केलं.
रविवारी धर्मशालामध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह खेळले नव्हते. बुमराह वैयक्तिक कारणामुळे घरी परतला होता, तर अक्षर पटेलला बरं नसल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. आता अक्षर पटेल पूर्ण सीरिजमधून बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अक्षर पटेलची तब्येत बरी नसल्यामुळे तो उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.
advertisement
अक्षर पटेलला आजारी असला तरीही तो टीम इंडियासोबत लखनऊमध्ये आहे. टीमचे डॉक्टर अक्षरवर उपचार करत आहेत. अक्षर पटेलच्याऐवजी शाहबाज अहमदची लखनऊ आणि अहमदाबादमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांसाठी टीममध्ये निवड करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह सीरिजच्या उरलेल्या मॅच खेळणार का नाही? याबद्दल मात्र बीसीसीआयने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

शेवटच्या 2 सामन्यांसाठी भारतीय टीम

advertisement
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : चौथ्या T20 आधी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅच विनर पूर्ण सीरिजमधून बाहेर!
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement