चहलचा डॅशिंग लूक आणि कॅप्शन
युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर आपले काही डॅशिंग आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आणि त्याला दिलेले कॅप्शन सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये चहलने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँट परिधान केली आहे, ज्यामुळे त्याचा लूक खूपच हँडसम आणि आकर्षक दिसत आहे. त्याने मॅचिंग फॉर्मल शूजही घातले आहेत. कधी सोफ्यावर बसून, तर कधी उभे राहून, चहलने एकापेक्षा एक उत्तम पोज दिल्या आहेत. त्याचा हा 'स्वॅग' चाहत्यांना खूप आवडला आहे.
advertisement
मात्र, या फोटोंपेक्षा जास्त चर्चा त्याच्या कॅप्शनची होत आहे. चहलने कॅप्शनमध्ये लिहिले, "शादी के लिए तैयार हूं, बस एक लड़की चाहिए!" सोबत त्याने काही मजेशीर आणि हसणारे इमोजीही जोडले आहेत.
चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर
चहलची ही पोस्ट म्हणजे गंमत आहे की, त्याने खरंच लग्नासाठी 'शोध' सुरू केला आहे, याबद्दल आता चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. घटस्फोटानंतर चहलने पुन्हा एकदा लग्न करण्याची तयारी सुरू केली असावी, असा अंदाज अनेक चाहते व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्याला 'पोरगी शोधायला मदत' करण्याची तयारी दर्शवली आहे. युजवेंद्र चहलने विनोदी पद्धतीने ही पोस्ट केली असली, तरी यातून त्याने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे स्पष्ट होत आहे.
