कल्याण-डोंबिवली महापालिका आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 30 हजार देशी झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार झाडे लावली जातील. मियावाकी पॅटर्न हा जगभर प्रसिद्ध असून तो कल्याण-डोंबिवलीकरांना देखील फायद्याचा ठरणार आहे.
Rajma Farming : कमी क्षेत्रात मिळेल जास्त उत्पादन, अशी करा 90 दिवसांत राजमा शेती, Video
advertisement
दरम्यान, गेल्या काही काळात महापालिकेने विविध ठिकाणी मियावाकी पद्धतीने अनेक ठिकाणी वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे कमीत कमी जागेत अतिशय दाट वनराई फुलण्यास मदत होणार असून निसर्गाला देखील फायदा होईल, असा या कल्पनेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी मांडा-टिटवाळा परिसरातील इंदिरानगर स्मशानभूमीच्या परिसरात मियावाकी पद्धतीने वनराई फुलवण्यात येणार आहे.
कोणती झाडे लावणार?
कल्याण-डोंबिवली महापालिका मियावाकी पद्धतीने देशी झाडांचीच लागवड करणार आहे. यामध्ये वड, पिंपळ, कदंब, उंबर यांसोबतच मसाला, आयुर्वेदिक दृष्ट्या लाभदायी ठरणारी झाडेही लावण्यात येणार आहेत.
मियावाकी जंगलाची वैशिष्ट्ये
लवकर वाढ: साधारण 20-30 वर्षांत संपूर्ण नैसर्गिक जंगल तयार होते.
घनदाट हरित वातावरण: जागा कमी लागते, पण झाडे जास्त वाढतात.
जैवविविधता वाढते: पक्षी, फुलपाखरे, छोटे प्राणी यांचे आश्रयस्थान होते.
हवामान सुधारते: प्रदूषण कमी होण्यास मदत, ऑक्सिजन वाढ.
पाण्याची धारण क्षमता वाढते: जमिनीची सुपीकता सुधारते.
कुठे उपयुक्त?
मियावाकी जंगल हे शहरांमध्ये, रिकामी आणि ओसाड जमीन असलेल्या ठिकाणी, औद्योगिक परिसर या ठिकाणी उपयुक्त ठरते. तसेच स्मशानभूमी, शाळा, बागांच्या परिसरात देखील विकसित केले जाते.






