TRENDING:

लग्नानंतर 8 वर्षांनी झालं बाळ, पण नीट दूध पित नव्हतं, कारण असं की आईच्या काळजात चर्रर्र

Last Updated:

बाळाची आई म्हणाली, माझं बाळ हे 8 वर्षांच्या लग्नानंतर आयव्हीएफद्वारे झालं आणि आमच्यासाठी खूपच अनमोल आहे. अकाली आणि इतकं नाजूक बाळ जन्मल्यावर मी खूप घाबरले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लग्न झालं की काही महिन्यांनी बहुतेक नातेवाईकांचं सुरू होतं, की आता गूड न्यूज कधी. आणखी काही महिन्यांनी त्या कपललाही आपल्याला बाळ कधी होणार याची प्रतीक्षा असते. असंच बाळाची प्रतीक्षा करणारं कपल. त्यांना लग्नानंतर तब्बल 8 वर्षांनी बाळ झालं. पण त्यांच्या या आनंदाला विरजण लागलं. एकतर आधीच हे बाळ प्रिमॅच्युअर, त्याचं वजन कमी, त्यात ते बाळ नीट दूध पित नव्हतं. यामागील कारण समजताच सगळ्यांना धक्का बसला. आईच्या काळजाचं तर पाणी पाणी झालं.
News18
News18
advertisement

गुजरातमध्ये जन्मलेलं हे बाळ. 30 आठवड्यांनी जन्माला आलं. त्याचं वजन फक्त 1.3 किलो. त्याला टाइम सी ट्रॅकिओ इसोफॅजिअल फिस्टुला (TEF) या दुर्मिळ जन्मजात समस्येचं निदान झालं. यात श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये असामान्य जोड निर्माण होते. ज्यामुळे जास्त लाळ येणं, गुदमरणं तसंच फुफ्फुसांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या बाळाला या समस्येमुळे जीवघेण्या अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याच्या पालकांनी उपचारासाठी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलचे बालरोग विभागप्रमुख डॉ. फजल नबी यांच्याशी संपर्क साधला. प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून डॉ. नबी स्वतः वापीला गेले आणि बाळाला कृत्रिम श्वसनासह त्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे जसलोक हॉस्पिटलमध्ये आणलं.

advertisement

Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...

बाळाला तत्काळ बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. जिथे डॉ. फजल नबी यांनी उपचारांची जबाबदारी घेतली. त्यावेळी बाळ व्हेंटिलेटरवर होतं, इनोट्रोप्ससह हेमोडायनामिक स्टॅबिलायझेशन करण्यात आलं आणि सेप्सिसवरील उपचार सुरू करण्यात आले. यानंतर प्रसिद्ध बालशल्यचिकित्सक डॉ. नार्गिश बारसिवाला यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. त्यांनी बाळ स्थिर झाल्यावर एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया करणं उचित असल्याचं सांगितलं.

advertisement

तिसऱ्या दिवशी डॉ. बारसिवाला यांनी फिस्टुला लिगेशन आणि इसोफॅजियल अ‍ॅनास्टोमोसिससह वन-स्टेज करेक्टिव्ह सर्जरी केली. त्यानंतर बाळाला पुन्हा अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतरच्या काळात टीमला आतड्यांच्या हालचालींबाबत आणखी एक समस्याला सामोरं जावं लागलं. प्रीमॅच्युरिटी आणि कमी वजनामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होत नव्हती. बाळाला एनजी ट्यूबद्वारे दूध देण्यात आलं आणि काही प्रमाणात टोटल पॅरेन्टेरल न्यूट्रिशन दिलं गेलं. त्याला गिळण्यासही अडचण होत होती. साधारणतः एक महिना एनजी ट्यूबद्वारे फीड देण्यात आलं. नंतर फीडिंग गॅस्ट्रोस्टोमीचा निर्णय घेण्यात आला आणि एनजी ट्यूब काढण्यात आली.'

advertisement

म्हणे, 'ही देवाची देणगी'! 66व्या वयात महिला प्रेग्नंट, 10 मुलांना दिला जन्म

एका महिन्यानंतरही बाळाला गिळण्यास अडचण येत होती. ही अडचण दूर करण्यासाठी गॅस्ट्रोस्टोमी प्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या टीमने सर्वात छोटा उपलब्ध डायलटेर वापरून उच्च-जोखमीची इसोफॅजियल डायलटेशन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही नाजूक प्रक्रिया जसलोक हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सल्लागार डॉ. पंकज धवन यांनी पार पाडली. या प्रक्रियेमध्ये बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. फजल नबी, डॉ. बारसिवाला आणि भूलतज्ज्ञ टीमचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. हळूहळू बाळ स्वतः गिळू लागलं आणि अखेरीस एनजी ट्यूब काढण्यात आली.

advertisement

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील बालरोग विभागाचे संचालक डॉ. फजल नबी म्हणाले, “जेव्हा बाळ आलं तेव्हा ते अत्यंत नाजूक आणि कमकुवत होतं. त्याला तातडीच्या उपचारांची गरज होती. स्थिरीकरणापासून शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतींच्या व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक पायरी काळजीपूर्वक नियोजित करावी लागली. इसोफॅजियल डायलटेशन हे विशेषतः आव्हानात्मक होतं, पण आमच्या टीमने उत्तम समन्वयाने हे साध्य केलं. आता बाळ स्वतः फीड घेत आहे आणि घरी जाण्यास तयार आहे."

बापरे! काय हे बाळ, नर्स-डॉक्टर पाहूनच थक्क, हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ त्याच्याच सेवेत

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे बालशल्यचिकित्स डॉ. नार्गिश बारसिवाला म्हणाल्या, “1 किलोपेक्षा थोडं जास्त वजन असलेल्या अकाली बाळावर शस्त्रक्रिया करणं अत्यंत कठीण असतं. ऊती अत्यंत नाजूक असतात, आणि चूक झाली तर जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र परिस्थिती अशी होती की प्रतीक्षा शक्य नव्हती. आम्ही सिंगल-स्‍टेज करेक्टिव सर्जरी करण्याचा निर्णय घेतला, जोखीम माहिती असूनही, दीर्घकालीन फायद्यांचा विचार केला. यशस्वी निकाल अचूक शस्त्रकौशल्यामुळे, भूलतज्ज्ञ डॉ. रजनी प्रजीश, डॉ. कोटवाला आणि शस्त्रक्रिया निवासी डॉक्टरांच्या सहाय्यामुळे शक्य झालं.”

कृतज्ञता व्यक्त करताना बाळाची आई त्रुप्ती म्हणाली, “माझं बाळ हे 8 वर्षांच्या लग्नानंतर आयव्हीएफद्वारे झालं आणि आमच्यासाठी खूपच अनमोल आहे. अकाली आणि इतकं नाजूक बाळ जन्मल्यावर मी खूप घाबरले होते. पण जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उपचारांनी आणि सहवेदनेने आम्हाला आशा मिळाली. मला विश्वास आहे की त्यांच्या कौशल्याशिवाय आणि सेवाभावाशिवाय माझं बाळ आज इथं नसतं.”

सगळ्यात कमी वजनाच्या बाळावर शस्त्रक्रिया झालेलं हे भारतातील पहिलंच प्रकरण. बहुविशेषज्ञ टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बाळ आता स्थिर असून फक्त आईचं दूध घेत आहे. बाळाचे वजन 1.8 किलो झाले आहे आणि लवकरच त्याला घरी पाठवण्यात येईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नानंतर 8 वर्षांनी झालं बाळ, पण नीट दूध पित नव्हतं, कारण असं की आईच्या काळजात चर्रर्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल