जाणून घेऊयात बदाम खाण्याचे फायदे आणि योग्य वेळ कोणती ते?
एका अहवालानुसार 28 ग्रॅम बदामात (अंदाजे 20 ते 23 बदाम) कार्बोहायड्रेट्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ई, 160 कॅलरीज, 3.5 ग्रॅम फायबर, 14 ग्रॅम हेल्दी फॅट्स, 6 ग्रॅम प्रथिनं असतात. बदाम अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण होतं. बदामाच्या साली या सुद्धा औषधी गुणधर्माने परीपूर्ण असतात. सालीसकट बदाम खाल्ल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण होतो त्यामुळे मेंदूला तर आराम मिळतोच मात्र, ॲसिडिटी आणि जळजळीपासून रक्षण होतं.
advertisement
दिवसाला किती बदाम खावेत ?
अनेकांना बदाम आवडतात त्यामुळे ते एकाच वेळी भरपूर बदाम खातात. मात्र असं करणं चुकीचं आहे. दिवसभरात 7-8 बदाम म्हणजे एका वेळी 2 ते 3 बदाम खाणं योग्य आहे. बदाम खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. दुधात किंवा पाण्यात भिजवून बदाम खाणं चांगलं मानलं जातं. त्यामुळे जळजळीपासून रक्षण होऊ शकेल. भाजलेले बदाम खाणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
बदाम कधी खावेत ?
सकाळी बदाम खाणं हे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यास अधिक फायद्याचं ठरू शकतं. जर तुम्हाला व्यायामाची सवय असेल तर तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी बदाम खाऊ शकता. यामुळे तुम्हाला चांगली उर्जा मिळेल. व्यायाम केल्यानंतर ग्रीक योगर्टसह बदाम खाल्ल्यास तुम्हाला थकवा जाणवणार नाही. यामुळे स्नायू बळकट होण्यासही मदत होईल. रात्री बदाम खाल्ल्याने तुम्हाला चांगली झोप येते. कारण बदामात असलेलं मॅग्नेशियम मेंदूला आराम देतं आणि निद्रानाशाची समस्या दूर करते.त्यामुळे ज्यांना उशीरापर्यंत झोप येत नाही किंवा ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांच्यासाठी बदाम खाणं फायद्याचं आहे.
बदाम खाण्याची योग्य पद्धत?
आपण पाहिलं की बदामात अनेक पोषकतत्त्वे आहेत. त्यामुळे सफरचंद किंवा केळीबरोबर बदाम खाणं हे फार फायद्याचं ठरू शकतं. यामुळे तुम्हाला नाश्ता करण्याची गरज पडणार नाही. किंबहुना नाश्ता केल्यानंतर तुम्हाला जितकी पोषकतत्त्वं आणि उर्जा मिळेल तितकाच फायदा केळी-बदाम किंवा सफरचंद आणि बदाम खाल्ल्याने मिळेल. कारण हा फायबरयुक्त आणि पौष्टिक नाश्ता असेल. बदमामुळे शरीरातील हेल्दी फॅट्ससह नैसर्गिक साखरेचं संतुलन साधलं जातं. बदाम दूध किंवा योगर्ट सोबत खाणं फायदेशीर असतं. यामुळे शरीरातील कॅल्शियम आणि प्रथिनांचं प्रमाण वाढतं. डार्क चॉकलेट आणि बदाम एकत्र खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. बदामाचा वापर खीर, हलवा, ओट्स, स्मूदी, शेक इत्यादींबरोबर करता येईल. ज्यांना हृदयाचा त्रास, डायबिटीस, गर्भार महिला, लहान मुलं, खेळाडू इत्यादींसाठी बदाम खाणं फायद्याचं आहे. मात्र ज्यांना मूत्रपिंडाचा त्रास आहे अशांनी बदाम खाणं टाळावं.