मुंबई : अनेक पुरुष मंडळींची नेहमी तक्रार असते की त्यांना शॉपिंगसाठी फार कमी पर्याय असतात. मात्र आता ही तक्रार कुठेतरी थांबणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला दादरच्या एका अशा दुकानाबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्हाला अगदी होलसेलच्या दरात आणि कमी दरात कपडे विकत घेता येतील. वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट, शॉर्ट कुर्ती, वेगळ्या प्रकारच्या मटेरियलचे ट्राउझर पॅन्ट इथे तुम्हाला स्वस्तात मिळून जातील. दादर रेल्वे स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर असलेले मनीष मार्केट हे पुरुष मंडळींना शॉपिंग करण्यासाठी अगदी उत्तम ठिकाण आहे.
advertisement
मनीष मार्केटच्या मोदी गारमेंट या दुकानातून जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकता. क्रोकोडाइल प्रिंट असलेले शर्ट इथे तुम्हाला फक्त 300 रुपयांमध्ये मिळून जातील. स्ट्रेचेबल अशा लायक्रा फॅब्रिकचे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट तुम्हाला इथे 350 रुपयांमध्ये विकत मिळतील. याच्यात तुम्हाला 25 पेक्षा अधिक रंग निवडता येतात. जर तुम्हाला ट्राउझर विकत घ्यायची असेल तर त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या कपड्यांमध्ये 8 ते 9 प्रकारचे ट्राउझर विकत मिळतील. फक्त 300 रुपयांना ट्राउझर तुम्हाला इथे विकत मिळेल. ट्राउझरची साईज 28 पासून ते 42 पर्यंत अशी आहे.
जगात भारी, कोल्हापूर सुंदरी! 5 स्टार हॉटेलची रूम नाही, ही तर रिक्षा; सुविधा पाहिल्या का?
यामध्ये तुम्हाला लायक्रा फॅब्रिक, बीएमडब्ल्यू फॅब्रिक असे वेगवेगळे प्रकार देखील मिळून जातील. बीएमडब्ल्यू नावाच्या फॅब्रिकची ट्राउझर तुम्हाला 350 रुपयांना विकत मिळेल.कमीत कमी 50 पिसेस तुम्हाला या ठिकाणी विकत घ्यावे लागतात. तसेच तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे दुकान एकदम उत्तम ठिकाण आहे. या दुकानातून पुणे, नाशिक, राजस्थान भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला डिलिव्हरी पोहोचवली जाईल. तसेच भारताच्या बाहेर दुबई, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये मोदी गारमेंट दुकानाचे कपडे पोहोचवले जातात. मग जर तुमचे कोणी पुरुष मित्र मैत्रिणी असतील किंवा पुरुषांना खूप सारी शॉपिंग करायची असेल तर दादरच्या मनीष मार्केटमधील मोदी गारमेंट या दुकानाला नक्की भेट द्या.