TRENDING:

Health Tips : बहुगुणी, बहुपयोगी औषधी वनस्पती, सविस्तर वाचा भृंगराजची उपयुक्तता

Last Updated:

भृंगराजला भारतात भांगडा, माका, बाबरी, केसुती इत्यादी विविध नावांनी ओळखलं जातं. भृंगराजमधे असलेले अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि निरोगी पेशी राखण्यास मदत करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भृंगराज ही एक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. महाभृंगराज तेलामुळे केसांची गळती कमी होते. केसांसाठी, टाळूसाठी भृंगराज तेल वरदान आहे. केसांपासून ते यकृत, मूत्रपिंड आणि त्वचेपर्यंत विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी भृंगराजचा वापर केला जातो. आयुर्वेदात त्याला केसरजा म्हणतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील ही वनस्पती ओळखली जाते.
News18
News18
advertisement

भृंगराजला भारतात भांगडा, माका, बाबरी, केसुती इत्यादी विविध नावांनी ओळखलं जातं. भृंगराजमधे असलेले अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि निरोगी पेशी राखण्यास मदत करतात.

Health Tips : सुस्ती घालवण्यासाठी हेल्थ टिप्स, दिवस जाईल फ्रेश आणि आनंदी

भृंगराज ही एक बहुउपयोगी औषधी वनस्पती आहे. केसांचं आरोग्य सुधारण्याबरोबरच यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्था यांसारखे अंतर्गत अवयव देखील यामुळे मजबूत होतात. योग्य पद्धतीनं आणि प्रमाणात वापरलं तर यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून रक्षण होतं.

advertisement

केस गळणं, पांढरे होणं आणि टक्कल पडणं या समस्या रोखण्यासाठी याचा वापर सर्वात जास्त केला जातो. यामुळे यकृताचं हेपेटायटीस सी सारख्या विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करणं शक्य होतं.

भृंगराजचा वापर - भृंगराज पावडर, रस, कॅप्सूल किंवा तेलाच्या स्वरूपात सेवन केलं जाऊ शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसातून दोनदा दोन-तीन ग्रॅम भृंगराज पावडर मधासह घेऊ शकता. केसांच्या समस्यांसाठी भृंगराज तेल टाळूला लावणं खूप फायदेशीर आहे.

advertisement

Health Drink : हेल्थ ड्रिंकची जादू, महिनाभरात कमी होईल वजन, वाचा उपयुक्त टिप्स

भृंगराजच्या पानांपासून बनवलेली पेस्ट त्वचेच्या आजारांवर फायदेशीर आहे. अपचन, बद्धकोष्ठता, गॅस आणि भूक न लागणं यासारख्या पोटाच्या समस्यांवर देखील प्रभावी आहे.  यामुळे जळजळ कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

भृंगराज ही सुरक्षित औषधी वनस्पती मानली जात असली तरी, जास्त प्रमाणात खाल्ल्यानं पोटदुखी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला आणि मधुमेह असलेल्यांनी भृंगराज सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : बहुगुणी, बहुपयोगी औषधी वनस्पती, सविस्तर वाचा भृंगराजची उपयुक्तता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल