Health Tips : शरीर आणि मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी सुपर उपाय, हृदयविकारतज्ज्ञांच्या टिप्सचा नक्की होईल उपयोग

Last Updated:

एखादं काम करताना, सुस्ती येत असेल तर अधूनमधून चहा किंवा कॉफी पिऊन लक्ष एकाग्र करावं लागतं. पण याचा परिणाम तात्कालिक असतो. काही काळानंतर, आळस येतो. याचं प्रमाण कमी करण्यासाठी हृदयविकारतज्ज्ञांनी दोन सोप्या आणि प्रभावी युक्त्या सांगितल्या आहेत. ज्यामुळे आळस दूर होणं आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते.

News18
News18
मुंबई : तब्येतीच्या काही कारणांमुळे किंवा धावपळीमुळे अनेकांना दिवसभर आळस, थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. कधीकधी, रात्री पूर्ण झोपल्यानंतरही, शरीर सुस्त राहतं, त्यामुळे मेंदू योग्यरित्या कार्य करत नाही किंवा योग्यरित्या लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही.
एखादं काम करताना, सुस्ती येत असेल तर अधूनमधून चहा किंवा कॉफी पिऊन लक्ष एकाग्र करावं लागतं. पण याचा परिणाम तात्कालिक असतो. काही काळानंतर, आळस येतो. याचं प्रमाण कमी करण्यासाठी हृदयविकारतज्ज्ञांनी दोन सोप्या आणि प्रभावी युक्त्या सांगितल्या आहेत. ज्यामुळे आळस दूर होणं आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते.
advertisement
कार्डि ओलॉजिस्ट संजय भोजराज यांनी याबद्दलचा व्हिडिओइंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. वारंवार थकवा किंवा सतत आळस येत असेल तर हे केवळ कॅफिनच्या कमतरतेमुळे होत नाही. यामागची मूळ कारणं समजून घेण्याची गरज आहे.
शरीराचं कार्य योग्यरित्या करण्यासाठी आवश्यक असलेले घटक पोहचत नाहीत. आळस आणि थकवा दूर करायचा असेल, तर दररोज फक्त दोन सोप्या गोष्टी करा.
advertisement
उठल्याबरोबर थोडा सूर्यप्रकाश घ्या - जागं झाल्यानंतर एका तासाच्या आत सकाळी दहा-पंधरा मिनिटं उन्हात घालवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शरीराच्या सर्कॅडियन लय किंवा बॉडी क्लॉकचं नियमन करण्यासाठी हे उपयुक्त आहे आणि यामुळे कोर्टिसोलची पातळी संतुलित राहते. यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जावान वाटतं. सूर्यप्रकाश शरीराला सक्रिय राहण्याची वेळ आली आहे असं सूचित करतो. यामुळे दिवसभर मन एकाग्र राहण्यास मदत होते आणि रात्री चांगली झोप येते.
advertisement
जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून दूर रहा - दिवसभर उत्साही राहण्यासाठी, जंक फूड आणि प्रक्रिया केलेलं अन्न टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जास्त प्रक्रिया केलेल्या पॅकेज्ड फूडमुळे रक्तातील साखर वाढते आणि नंतर वेगानं कमी होते. या चढ-उतारामुळे शरीराची ऊर्जा कमी होते.
advertisement
शरीराला योग्य ऊर्जा मिळावी यासाठी दिवसभर केवळ संतुलित, घरी शिजवलेलं जेवण खाण्याचा प्रयत्न करा.  यासाठी तुमच्या आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनं असणं आवश्यक आहे. यामुळे शरीराला कायमस्वरूपी ऊर्जा मिळत राहते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : शरीर आणि मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी सुपर उपाय, हृदयविकारतज्ज्ञांच्या टिप्सचा नक्की होईल उपयोग
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement