advertisement

Diwali Diet : फराळाचं घेऊ नका टेन्शन, अपचन, पोटदुखी टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Last Updated:

ऐन दिवाळीत गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या त्रासाशिवाय चविष्ट फराळाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर ही माहिती महत्त्वाची आहे. सणासुदीच्या काळात अनेकांना अपचनाचा त्रास होतो, ज्यामुळे सणाचा आनंद कमी होऊ शकतो. पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी ओवा, बडीशेप, जिरं, आल्याचा वापर कसा करायचा समजून घेऊया.

News18
News18
मुंबई : पुढच्या आठवड्यात दिवाळी सुरु होईल. दिवाळी म्हटलं की फराळ, मिठाई आलीच. भरपूर साखर आणि तेल असलेले हे पदार्थ लागतात चविष्ट आणि खाण्याचा मोहही आवरणं कठीण होतं. अशावेळी, आग्रहानं काही पदार्थ खाल्ले जातात आणि पोटाचं गणित बिघडतं.
दिवाळीत बऱ्याचदा जास्त तळलेलं अन्न, फराळ आणि मिठाई खाल्ल्यानं गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दिवाळीत मनापासून पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल आणि पोटाच्या समस्या टाळायच्या असतील, तर हे पाच सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
advertisement
जेवणानंतर प्या ओव्याचं पाणी - ओवा पोटासाठी वरदान आहे. यातल्या घटकांनी पचन सुधारतं आणि गॅस लवकर कमी होतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा उकळवा. पाणी अर्धं कमी झाल्यावर ते गाळून हळूहळू प्या. जेवणानंतर ते प्यायल्यानं पोटाला आराम मिळेल.
आलं - आल्यात पचनाचे गुणधर्म आहेत. आम्लपित्त आणि मळमळ यासाठी देखील आलं खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर आल्याचा एक छोटा तुकडा सैंधव मीठासह चावा. यामुळे अन्न पचण्यास मदत होईल आणि पोट हलकं वाटेल.
advertisement
जिरं - जिऱ्याचं पाणी पिणं हा पोटदुखीवर रामबाण पर्याय आहे. एक चमचा जिरं वाटून एक ग्लास पाण्यात घाला. काही मिनिटं उकळवा आणि थंड झाल्यावर प्या. या उपायानं पचन सुधारतं आणि आम्लपित्त कमी होतं.
हिंग -  पचनासाठी हिंग सर्वात प्रभावी आहे. हिंग हा पोटफुगी आणि गॅस कमी करण्यासाठी एक प्राचीन आणि प्रभावी उपाय मानला जातो. कोमट पाण्यात चिमूटभर हिंग विरघळवून प्या. यामुळे गॅस लगेच कमी होईल.
advertisement
बडीशेप आणि साखरेचं मिश्रण - बडीशेपेमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि मौखिक आरोग्यासाठीही बडीशेप उपयुक्त आहे. यामुळे मुख दुर्गंधी कमी होते. साखरेसोबत बडीशेप खाल्ल्यानं त्याचा प्रभाव जाणवतो. जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि साखर चघळा. यामुळे यामुळे मुख दुर्गंधी कमी होते आणि अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळही कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Diet : फराळाचं घेऊ नका टेन्शन, अपचन, पोटदुखी टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement