Hair Mask : केस गळतीवर प्रभावी उपाय, हेअर मास्कनं वाढेल केसांची चमक आणि वाढ

Last Updated:

मेथीच्या दाण्यांसह इतर जिन्नस वापरुन हेअर मास्क तयार करता येतात. यामुळे केस गळती थांबतेच पण केस मुळांपासून मजबूत देखील होतात. मेथी, दही आणि मध, मेथी, आवळा आणि लिंबू, मेथी, अंडी आणि ऑलिव्ह ऑइल अशा तीन मास्कचा केसांसाठी चांगला उपयोग होतो.

News18
News18
मुंबई : केस गळण्यामागे अनेक कारणं असतात. केस गळणं ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. महिला असो वा पुरुष, सर्व वयोगटातही ही समस्या जाणवते. ऑफिसचा ताण, चुकीचा आहार आणि प्रदूषण यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात.
केस गळण्याच्या समस्येवर उत्तर म्हणून अनेक उपाय तुम्हीही वापरले असतील पण दरवेळी नवीन शाम्पू आणि उपचार वापरून कंटाळला असाल तर यावेळी आजीच्या काळातला मेथी दाण्यांचा उपाय वापरून पहा.
मेथीच्या दाण्यांसह इतर जिन्नस वापरुन हेअर मास्क तयार करता येतात. यामुळे केस गळती थांबतेच पण केस मुळांपासून मजबूत देखील होतात. मेथी, दही आणि मध, मेथी, आवळा आणि लिंबू, मेथी, अंडी आणि ऑलिव्ह ऑइल अशा तीन मास्कचा केसांसाठी चांगला उपयोग होतो.
advertisement
मेथी, दही आणि मध - या तिन्हीचा मास्कमुळे केस चांगले मॉइश्चरायझ आणि मजबूत होतात. हा हेअर मास्क नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो.
हा मास्क बनवण्यासाठी, एक वाटी मेथीचे दाणे रात्रभर भिजत घाला. सकाळी ते बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा मध घाला. हे मिश्रण टाळूला लावा, तीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूनं धुवा. यामुळे केस मॉइश्चरायझ होतील, कोरडेपणा कमी होईल आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होईल.
advertisement
मेथी, आवळा आणि लिंबू: हे तिन्ही घटक केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम मिश्रण आहे.  केस लवकर आणि नैसर्गिकरित्या वाढायचे असतील तर हा मास्क चांगला पर्याय आहे. मेथी पावडरमधे आवळा पावडर आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट केसांना तीस मिनिटं लावा. यामुळे टाळू स्वच्छ होईल, कोंडा कमी होईल आणि केसांची वाढ होईल.
advertisement
मेथी, अंडी आणि ऑलिव्ह ऑइल याचा मास्क वापरल्यानं केसांना नैसर्गिक चमक येईल. केसांत नैसर्गिक चमक आणि मऊपणा हवा असेल तर हा हेअर मास्क वापरून पहा. यासाठी मेथी पावडर एका अंड्यात आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि तीस मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसांवर चमक येईल, केस मजबूत आणि गुळगुळीत होतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Mask : केस गळतीवर प्रभावी उपाय, हेअर मास्कनं वाढेल केसांची चमक आणि वाढ
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement