Marathi Actress : बॉब कट लुकमध्ये झाली फेमस, 'शिवा' पुन्हा येतेय, अभिनेत्रीची नवी मालिका, प्रोमो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
शिवा या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झालाय.
काही मालिका या त्यांच्या कथानकामुळे कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. तर काही मालिका त्यातील कॅरेक्टर्स, तर कधी कधी त्यांची एखादी स्टाइलही प्रेक्षकांच्या डोक्यात पक्की बसलेली असते. अशीच एक मालिका म्हणजे शिवा. काही महिन्यांआधीच शिवा या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. झी मराठीवरील या मालिकेनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं.
मालिकेतील नायिका ही टॉम बॉय दाखवण्यात आली होती. पुढे तिनं मन बदललं. ती प्रेमात पडते, लग्न करते पण तिची टॉम बॉयवाली बॉब कट हेअर स्टाइल काही ती बदलत नाही. शिवा आणि तिची बॉब कटवाली हेअर स्टाइल या मालिकेची एक वेगळी ओळख बनली होती.
advertisement
अनेक वर्ष नाटक आणि मालिकांमध्ये साइड रोल करणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिनं शिवाची भूमिका साकारली होती. अनेक वर्षांनी अभिनेत्रीला लीड रोल करण्याची संधी मिळाली ती तिने उत्तमरित्या निभावली. मालिकेत पूर्वा कौशिकबरोबर अभिनेता शाल्व खिंजवडेकर प्रमुख भूमिकेत होता.
शिवा मालिका संपल्यानंतर अभिनेत्री पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पूर्वाला नवी मालिका मिळाली असून या मालिकेतही ती लीड रोलमध्ये दिसणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. यावेळी अभिनेत्री पूर्वा कौशिक ही बॉब कटमध्ये नाही तर नॉर्मल मुलींसारख्याच लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
advertisement
advertisement
'दीप ज्योती' असं पूर्वाच्या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेत ती ज्योती ही भूमिका साकारत आहे. ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरू होणार आहे. आता अभिनेत्री पूर्वा कौशिकची ज्योती ही भूमिका कशी असणार? मालिकेची कथा काय असणार? या सगळ्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.
पूर्वा कौशिकबरोबर अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शिवा आणि पारू या मालिकेत अनेकदा टक्कर होती. आता दोन मालिकेतील कलाकार एकाच मालिकेत दिसणार आहेत. पारू मालिकेनं काही दिवसांआधीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर लगेचच प्रसाद जवादे 'दीप ज्योती' या मालिकेत दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 4:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Actress : बॉब कट लुकमध्ये झाली फेमस, 'शिवा' पुन्हा येतेय, अभिनेत्रीची नवी मालिका, प्रोमो








