IPL खेळायला जायचं नाही... क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळाडूंना तंबी, शेवटच्या क्षणी टीमना जबर धक्का!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना धक्का दिला आहे.
मुंबई : आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना धक्का दिला आहे. आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबादचे दिग्गज ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर आयपीएलचे सुरूवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांना आयपीएल खेळण्यासाठी परवानगी मिळालेली नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल टीमने कमिन्स आणि हेजलवूड यांना आयपीएल खेळण्यासाठी एनओसी देण्यात आलेलं नाही. मेडिकल टीमकडून एनओसी मिळाल्यानंतर दोघंही काही सामने खेळू शकतात.
कमिन्स-हेजलवूडचं रिहॅब
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार दोन्ही स्टार खेळाडूंची रिहॅबिलिटेशन सुरू आहे, तसंच दोघांचंही आयपीएलच्या पहिल्या सामन्याआधी फिट होणं अशक्य आहे. 'मागच्या आठवड्यापेक्षा जास्त काहीही बदललेलं नाही. फिजियोकडून अजूनही त्यांना मंजुरी मिळालेली नाही. दोघांचंही रिहॅब सुरू आहे. हेजलवूड आणि कमिन्स सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत. स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात दोघं काही मॅच खेळतील, अशी अपेक्षा आहे, पण तेदेखील मंजुरीवर अवलंबून आहे. मंजुरी मिळाली की दोघं भारतात येण्यासाठी रवाना होतील', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
पॅट कमिन्सने डिसेंबर 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध ऍडलेडमध्ये शेवटची मॅच खेळली होती. या सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये कमिन्सने 3-3 विकेट घेतल्या होत्या. तर हेजलवूड मागच्या आयपीएल मोसमात आरसीबीचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. नोव्हेंबर 2025 मध्ये हेजलवूड त्याची स्थानिक टीम न्यू साऊथ वेल्सकडून शेवटची मॅच खेळला, यानंतर दुखापतीमुळे हेजलवूड ऍशेसच्या पाचही मॅच खेळू शकला नाही.
advertisement
नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही कमिन्स आणि हेजलवूड खेळले नव्हते. आयपीएलमध्ये पॅट कमिन्स हा सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन आहे, त्यामुळे कमिन्सच्या गैरहजेरीमध्ये हैदराबादला नवा कॅप्टन शोधावा लागणार आहे. हेजलवूडच्या गैरहजेरीमध्ये आरसीबीकडून न्यूझीलंडचा जेकब डफी किंवा श्रीलंकेच्या नुवान तुषाराला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. तर कमिन्सच्या जागी इंग्लंडचा ब्रायडन कार्स किंवा श्रीलंकेचा एहसान मलिंगा सुरूवातीच्या सामन्यांमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 4:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL खेळायला जायचं नाही... क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळाडूंना तंबी, शेवटच्या क्षणी टीमना जबर धक्का!










