advertisement

Mumbai Metro: मेट्रो 9 आणि 2 B कधी धावणार? MMRDA ने दिली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदारांच्या सेवेमध्ये मेट्रो 4, 9 आणि 2 B केव्हापासून दाखल होणार? या विचारात प्रत्येकजण आहे. आता अशातच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Mumbai Metro Line 12A Extension Kalyan Shilphata Road Taoja Approved Know All About
Mumbai Metro Line 12A Extension Kalyan Shilphata Road Taoja Approved Know All About
मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक मेट्रोची कामे सुरू आहेत. पण असं असलं तरीही अजूनही काही मेट्रो अजूनही नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मेट्रो 9 आणि मेट्रो 2 B या दोन मेट्रो अजूनही प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या नाहीत. मेट्रोचे सर्व काम पूर्ण झाले असले तरीही, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (CRMS) उपस्थितीत सुरक्षा चाचण्या सुद्धा सर्व पूर्ण झाल्या आहेत, पण अजूनही या दोन्हीही मेट्रोंना अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या दोन्हीही मेट्रोंना हे प्रमाणपत्र केव्हापर्यंत मिळणार आणि केव्हापर्यंत मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
दहिसर पूर्व ते मीरा- भाईंदर मार्गावर धावणारी मेट्रो 9 आणि अंधेरी डी. एन. नगर ते मंडाले पर्यंत धावणारी मेट्रो 2 B. यासोबतच आणखी एक मेट्रो म्हणजे, मेट्रो 4. ही मेट्रो वडाळा ते कासारवडवली या मार्गावर धावणारी आहे. मेट्रो 4 ची सुद्धा अद्याप सेवा सुरू झालेली नाही. अनेक नोकरदार वर्ग या मेट्रोच्या प्रतिक्षेत आहे. पण असं असलं तरीही या मेट्रोसाठी अद्याप एमएमआरडीए सावध भूमिकेत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपूर्वीच मेट्रो 4 च्या मार्गातील स्लॅब कोसळल्याची घटना मुलुंडमध्ये घडली होती. या कारणामुळे सध्या एमएमआरडीए सावध भूमिकेत आहे. मेट्रो 4 चे मार्ग पूर्ण झाले असले तरी 4 अ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून त्याची ट्रायल रन सुरू आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वीच मेट्रो 4 ची सुद्धा ट्रायल रन घेतली होती. स्लॅब कोसळण्याची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा संपूर्ण मार्गिकेची तपासणी करूनच हिरवा कंदील दिला जाणार आहे. मेट्रो 9 चा पहिला टप्पा दहिसर ते काशिगांव असा पूर्णपणे तयार असून मेट्रो 2 B च्या ही मंडाळे ते डायमंड गार्डनर हा पहिला टप्पा सुद्धा पूर्णपणे तयार आहे. एकदा की मेट्रोकडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की, या दोन्हीही मेट्रो सुरू होतील. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार का? अशी सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मुंबईकरांचा उन्हाळ्यामध्ये गारेगार मेट्रोतून केव्हापासून प्रवास सुरू होणार? याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.दरम्यान, मेट्रो अधिकार्‍यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो सुरक्षा अधिकाऱ्यांनी मेट्रोविषयी काही सुधारणा सुचवल्या आहेत, त्याप्रमाणे काम केले जात आहे. त्यानंतर अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाईल. तेव्हाच मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल. उन्हाळ्याच्या सुरूवातीला मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मेट्रो 9 आणि 2 B कधी धावणार? MMRDA ने दिली महत्त्वाची अपडेट
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement