advertisement

“मी तुला पाकिस्तानात येऊन मारेन”, Dhurandhar 2 स्टारला मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या, घराबाहेर पडणंही अवघड

Last Updated:

Dhurandhar 2 चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून फिल्ममधील एका कलाकाराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. ट्रेलरमधील त्याचा एक वादग्रस्त डायलॉग इतका व्हायरल झाला आहे की त्याला आता घराबाहेर पडणे कठीण झालं आहे.

News18
News18
मुंबई : सध्या मनोरंजन विश्वात फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे ती म्हणजे धुरंधर २ ची. १९ मार्चला हा सिनेमा रिलीज होणार असून १८ तारखेला त्याचे पेड प्रिव्ह्यू शो असणार आहेत. या शोसाठी प्रेक्षकांनी हजारांच्या किंमतीची तिकिटे खरेदी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच या फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आणि या फिल्मची आतुरता अनेक पटींनी वाढली. दरम्यान, सध्या एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून फिल्ममधील एका कलाकाराला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. ट्रेलरमधील त्याचा एक वादग्रस्त डायलॉग इतका व्हायरल झाला आहे की त्याला आता घराबाहेर पडणे कठीण झालं आहे.

धुरंधर स्टारला मिळतायत धमक्या

चित्रपटात दहशतवादी जहूर मिस्त्री हे पात्र दाखवले गेले असून तो अजय सान्यालला म्हणतो, “हिंदू एक डरपोक कौम आहे.” या संवादामुळे अनेक प्रेक्षक संतप्त झाले आणि त्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्यावर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव सुरू झाला. अभिनेता विवेक सिन्हा यांनी धुरंधरच्या दुसऱ्या भागात दहशतवादी जहूर मिस्त्रीची भूमिका साकारली आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून सांगितले की, त्यांच्या या डायलॉगमुळे लोकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत. काही लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत. मात्र त्या प्रतिक्रियांमुळे ते नाराज नसून उलट त्यांना आनंदच होत असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement

धमक्या मिळूनही खूश आहेत विवेक सिन्हा

इतकंच नाही, तर त्यांना हेही वाटले नव्हते की दिग्दर्शक आदित्य धर फिल्मच्या ट्रेलरमध्ये त्यांचा डायलॉग वापरतील. त्यामुळे ट्रेलरमध्ये ट्रेलरमध्ये स्वतःला पाहून ते आश्चर्यचकित झाले. एका मुलाखतीत विवेक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, 'धुरंधर: द रिवेंज' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात त्यांच्या या डायलॉगने होईल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या मते, दिग्दर्शक आदित्य धर यांनी त्यांच्या डायलॉगमधून ट्रेलरचा मूड सेट केला, ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
advertisement
advertisement
विवेक यांनी त्यांच्या पात्राबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, आदित्य धर यांनी आधीच त्यांना या भूमिकेची संपूर्ण माहिती दिली होती. चित्रपटाच्या सेटवरही वातावरण खूप सकारात्मक होते, त्यामुळे अभिनय करताना त्यांना अवघडल्यासारखे वाटले नाही. सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि टीकेबद्दल बोलताना विवेक म्हणाले की त्यांना त्यांच्या कामासाठी जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी सांगितले की देशाच्या विविध भागांतून त्यांना आतापर्यंत किमान 300 मेसेज आले आहेत. अनेक लोक आपल्या भाषेत व्हिडिओ बनवून त्यांचा डायलॉग बोलताना दिसत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत.
advertisement

व्हिलन पात्राचेही फॅन झाले प्रेक्षक

त्यांनी असेही सांगितले की इंस्टाग्रामवर त्यांना सुमारे 1700 कमेंट्स मिळाल्या आहेत. त्यातील एका मुलीची कमेंट त्यांना खूप आवडली. त्या मुलीने लिहिले होते, “सर, मी तुम्हाला 2-3 शिव्या देऊ का? कारण तुम्हाला पाहून मला खूप राग आला. पण तुमच्या अभिनयाची मी फॅन झाले आहे.”
याशिवाय काही लोकांनी खूप आक्रमक कमेंट्सही केल्या. एका व्यक्तीने तर लिहिले की “मी तुला पाकिस्तानमध्ये येऊन मारेन.” अनेकांनी त्यांना खरा दहशतवादी असल्यासारखे संबोधले. विवेक यांच्या मते हे सगळे त्यांच्या अभिनयाचेच कौतुक आहे. त्यांच्या पात्रामुळे लोकांच्या मनात एवढा राग निर्माण झाला, हीच त्यांच्या अभिनयाची मोठी पावती आहे. विवेक सिन्हा हे धामपूर येथील रहिवासी असून त्यांनी अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'धुरंधर' व्यतिरिक्त त्यांनी 'दिल्ली क्राइम'च्या तिसऱ्या सीझनमध्ये तसेच 'तांडव' या सीरिजमध्येही भूमिका साकारली आहे. याशिवाय ते मनोज वाजपेयी यांच्या 'एक ही बंदा काफी है' या चित्रपटातही दिसले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
“मी तुला पाकिस्तानात येऊन मारेन”, Dhurandhar 2 स्टारला मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या, घराबाहेर पडणंही अवघड
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement