advertisement

Gudhi Padwa 2026: हिंदू मराठी नववर्ष, गुढी पाडवा का साजरा करावा? प्रत्येकाला माहीत हव्या अशा 5 गोष्टी

Last Updated:

Gudhi Padwa 2026: गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. अभ्यंगस्नान करून गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारून नवीन वर्षातील संकल्प करून त्या शुभकार्याचा प्रारंभ करण्याचा हा दिवस आहे. हिंदू मराठी नववर्षाचा हा दिवस आहे.

News18
News18
मुंबई : गुढीपाडवा दोन दिवसावर आला असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. गुढीपाडव्याला लोक आवर्जुन खरेदी करतात. खरेदी पूर्वी घरोघरी सकाळी गुढी काठी उभारून तिची पूजा केली जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस मानला जातो. अभ्यंगस्नान करून गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारून नवीन वर्षातील संकल्प करून त्या शुभकार्याचा प्रारंभ करण्याचा हा दिवस आहे. हिंदू मराठी नववर्षाचा हा दिवस आहे. नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्याचा वापर करण्याचा हा दिवस आहे. हिंदू नववर्ष गुढीपाडवा साजरा करण्याच्या परंपरेविषयी ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिलेली माहिती पाहुया.
वर्षारंभाचा दिवस - गुढीपाडवा सणाची उपपत्ती अनेक प्रकारे सांगण्यात आली आहे.
1. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितले गेले आहे. त्यामुळे जगाचा वाढदिवस गुढ्या उभारून या दिवशी साजरा केला जातो.
2. पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शकलोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली आणि त्या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. हा नूतन वर्षारंभाचा दिवस लोक गुढ्या उभारून साजरा करू लागले.
advertisement
3. भगवान श्रीविष्णूनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा नाश केला.त्यानंतर त्यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला.त्यावेळी अयोध्येतील लोकांनी गुढ्या- तोरणे उभारून त्यांचे भव्य स्वागत केले, त्या दिवसापासून गुढी उभारून चैत्र शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
advertisement
धार्मिक रूढी - गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. दरवाजासमोर रांगोळी घालावी. नवीन वस्त्रे परिधान करावीत. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची ( बांबूची ) काठी घेऊन , ती स्वच्छ करून तिच्या टोकास तांबडे वस्त्र व फुलांची माळ घालून त्यावर एक उपडी लोटी ठेवावी. अशा रितीने तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. काही लोक गुढीस बत्ताशांची माळही घालतात. या गुढीस ब्रह्मध्वज, असे म्हणतात.
advertisement
गुढीची पूजा कशी करावी - कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा घालून ते मिश्रण चांगले वाटावे. सर्वांनी ते थोडे थोडे खावे. वर्षारंभी कडूनिंबाचे सेवन केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचावे. गोड पदार्थांचे भोजन करून हा नूतन वर्षाचा प्रारंभ दिवस उत्साहाने साजरा करावा. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरावी. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचीही प्रथा आहे. शुभकार्याचा प्रारंभ करावा असेही सांगण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gudhi Padwa 2026: हिंदू मराठी नववर्ष, गुढी पाडवा का साजरा करावा? प्रत्येकाला माहीत हव्या अशा 5 गोष्टी
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement